Raju Shetty on Sharad Pawar: शरद पवार जातीयवादी नाहीत, रामदास आठवले यांच्यानंतर राजू शेट्टी यांच्याकडूनही पवारांची पाठराखण

पण काही असले तरी ते जातीयवादी नक्कीच नाहीत, असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही शरद पवार हे जातीयवादी नव्हे तर 'धर्मनिरपेक्ष' नेते असल्याचे म्हटले होते.

Raju Shetty on Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शेती, ऊस, हमीभाव यांसारख्या अनेक विषयांवरुन शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी माझे मतभेद जरुर आहेत. पण काही असले तरी ते जातीयवादी नक्कीच नाहीत, असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही शरद पवार हे जातीयवादी नव्हे तर 'धर्मनिरपेक्ष' नेते असल्याचे म्हटले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार हे जातियवादी असल्याचा जाहीर आरोप केला होता. या आरोपाला भाजपकडूनही पाठींबा दर्शविण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला राजू शेट्टी आणि रामदास आठवले यांच्यासारख्या नेत्यांनी मात्र मतभेद बाजूला ठेऊन शरद पवार यांची पाठराखण केली आहे.

राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना काही दिवसांपूर्वीच महाविकासाघाडीतून बाहेर पडली आहे. कोल्हापूर येथील एका सभेत राजू शेट्टी यांनी महाविकासआघाडी आणि आपला मार्ग वेगवेगळा झाल्याची घोषणा केली. आगामी काळात स्वाभिमानी पुन्हा एकदा महाविकासाघाडीत परतणार की भाजपसोबत जाणार हे अद्याप निश्चित झाले नाही. शेतीच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी हे नेहमीच सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधत असतात. शरद पवार यांच्यावरही ते नेहमीच टीका करतात. असे असले तरी शरद पवार हे जातीयवादी असल्याच्या भूमिकेवर मात्र शेट्टांनी पवार यांची बाजू घेतली आहे. (हेही वाचा, BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युती? ठाकरे, पवार यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त)

दरम्यान, शेतीच्या मुद्द्यावरुन राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर टीकाही केली आहे. ऊस हे आळशी लोकांचे पीक असल्याचे विधान शरद पवार यांनी अलिकडेच केले होते. यावर बोलताना राजू शेट्टी यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे. आजवर मला वाटत होते की, शरद पवार यांना शेतीचे सर्वाधिक ज्ञान आहे. परंतू, आता तसे वाटत नाही. आपल्याला आजवर उगाचच असे वाटत होते असे वाटते. शेतीच्या बाबतीच बोलायचे तर उस हे असे एकमेव पीक आहे. ज्याला निश्चित असा हमीभाव आहे. असाच भाव जर शेतीच्या इतर पिकांनाही मिळाला असता, तर शेतकरी नक्कीच इतर पिकांकडेही वळले असते, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

आजचे राजकारण प्रचंड बदलले आहे. राजकारणात धार्मिकता आणि जातीयता इतकी भिनली आहे की किळस यावी. ज्याला आपला धर्म, धार्मीक गोष्टी करायच्या आहेत त्याने आपापल्या घरात करावी. धार्मिकता ही भारतीय प्रवृत्ती आहे. त्यामुळे तिचे प्रदर्शन करण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या घरात देवघर असते. त्या त्या प्रमाणे ज्याने त्याने आपापली धार्मकता पाळावी, असेही शेट्टी म्हणाले. बेरोजगारी, महागाई हे नागरिकांचे खरे मुद्दे आहेत. नेत्यांनी त्यावर बोलायला हवे, असेही शेट्टी म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif