Vasantdada Sugar Institute: शरद पवार यांच्याकडून अमित शाह यांना निमंत्रण; पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटला सप्टेंबर महिन्यात भेट देण्याची शक्यता

केंद्रीय गृह आणि देशाचे नवे सहकारमंत्री अमित शाह (Sharad Pawa) हे आगामी महिन्यात पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (Vasantdada Sugar Institute Pune) भेट देण्याची शक्यता आहे.

Vasantdada Sugar Institute: शरद पवार यांच्याकडून अमित शाह यांना निमंत्रण;  पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटला सप्टेंबर महिन्यात भेट देण्याची शक्यता
Sharad Pawar and Amit Shah | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय गृह आणि देशाचे नवे सहकारमंत्री अमित शाह (Sharad Pawa) हे आगामी महिन्यात पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (Vasantdada Sugar Institute Pune) भेट देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सहकारावर चर्चा केली. या भेटीत शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिलं आहे. अमित शाह हे सप्टेंबर महिन्यात पुणे दौऱ्यावर आहेत. या वेळी ते शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची 17 जुलै रोजी भेट झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा, तर्कवितर्क लढविण्यात आले होते. मात्र, ही बैठक राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर होती. असे सांगत शरद पवार यंांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान, शरद पवार यांनी याबबत एक ट्विटही केले होते. तसेच, पंतप्रधानांना दिलेले पत्रही पवार यांनी ट्विटसोबत पोस्ट केले होते. त्यानंतर अल्पावधीतच शरद पवार आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट झाली. ही भेट दिल्ली येथे 3 ऑगस्ट रोजी झाली. (हेही वाचा, NCP: शरद पवार आणि अमित शाह यांच्यात आज भेट, तपशीलाबाबत उत्सुकता)

राज्यातील अनेक सहकारी साखरकारखान्यांविरोधात सरकारने कडक धोरण राबवले आहे. त्यामुळे विविध राजकीय नेत्यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आणि बिलं थकवलेल्या तसेच, व्यवहारांमध्ये अनियमितता असलेल्या कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, मध्यंतरी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती की, सहकार हा विषय राज्य सरकारच्याच कार्यक्षेत्राील आहे.

दरम्यान, अमित शाह आणि शरद पवार यांच्यात 3 ऑगस्टला जेव्हा भेट झाली त्याच दिवशी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते उपस्थित असतानाच दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि अमित शाह यांची भेट होती. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. परंतू, ही भेट सहकार विषयक होती, असे स्पष्ट करण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2021 10:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).