एकनाथ खडसे यांचा NCP मध्ये प्रवेश झाला म्हणून राज्य मंत्रिमंडळामध्ये बदल होणार ? पहा खुद्द शरद पवार यावर काय म्हणाले
तसेच कोणतीही अपेक्षा बोलून दाखवली नाही. असं म्हटलं आहे.
मुंबई मध्ये आज (23 ऑक्टोबर) भाजपाला रामराम करून एनसीपी मध्ये अखेर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा पक्षप्रवेश झाला. दरम्यान दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम आयोजित होता पण कार्यक्रमाला दीड दोन तास उशिर झाला. वाय बी चव्हाण सेंटर मध्ये त्यापूर्वी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची खाजगीत बैठक सुरू होती. त्यानंतर दोघेही एकाच गाडीने कार्यक्रम स्थळी दाखल झाले. त्यामुळेच माध्यमांमध्ये आता एकनाथ खडसेंसाठी राज्य मंत्रिमंडळामध्ये कुणाला आपली खुर्ची रिकामी करावी लागणार का? ती व्यक्ती जितेंद्र आव्हाड असेल का? अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र शरद पवारांनी सार्या अफवांना पूर्णविराम लावत एकनाथ खडसेंनी मला कोणत्याही पदासाठी मागणी केली नसल्याचं सांगितलं आहे. तसेच कोणतीही अपेक्षा बोलून दाखवली नाही. त्यांनी केवळ 40 वर्ष एका पक्षासाठी मेहनत केली आहे. माझा अनुभव आहे त्याच्यावर एनसीपी मध्ये प्रवेश मिळावा असं म्हटलं आहे. Prasad Lad Criticizes Eknath Khadse: भाजपवर आरोप करण्यापेक्षा एकनाथ खडसे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे; भाजप नेते प्रसाद लाड यांचा खोचक सल्ला.
दरम्यान अजित पवारांची नाराजी, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पद घेतलं जाईल अशा सार्या मीडीयात रंगणार्या चर्चा आहेत. सारे आहेत तिथेच राहतील असं सांगितले आहे. मात्र नाथाभाऊंच्या मदतीने खानदेशात राष्ट्रावादी वाढवायला मदत होईल असा विश्वास देखील बोलून दाखवला आहे. अजित पवार आजारी आहेत. कोरोनच्या काळात कोणी खबरदारी घेत घरी राहिलं तर ती त्याची चूक आहे क? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
एकनाथ खडसे यांनी गल्ली पासून दिल्ली पर्यंत जेव्हा त्यांनी पक्षांतराचा विचार बोलून दाखवला तेव्हा तुम्ही राष्ट्रवादी मध्ये जायला हवं असं सांगितलं आहे. त्यामुळे सार्यांचे विचार लक्षात घेऊन एनसीपीची निवड केली आहे. 'माझ्यावर गलिच्छ आरोप करताना खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करण्यात आलं.' हा उल्लेख त्यांनी पुन्हा पुन्हा केला आहे.
शरद पवारांप्रमाणेच पक्ष प्रवेशापूर्वी एकनाथ खडसे यांचे छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्यासोबतही चर्चा झालेली आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी एनसीपी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात आले आहे. या तिन्ही पक्षांना एकत्र जोडण्याचे काम शरद पवार करतात. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात या सरकारला वर्षपूर्ती होईल. हिवाळी अधिवेशनाच्या आसपास मंत्रिमंडळात खांदेपालट होऊ शकते अशी चर्चा आहे.