कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्यासमवेत घरात बसून लोकांमध्ये केली जनजागृती; व्हिडिओ व्हायरल

कोरोना व्हायरस वाढता प्रादुर्भाव पाहून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे.

Supriya Sule (Photo Credits-Twitter)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) थैमान घातले असून प्रशासनाकडून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना व्हायरस वाढता प्रादुर्भाव पाहून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. यातच घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका व्हिडिओच्या माध्यामातून उत्तर दिले आहे. तसेच आम्ही घरात बसून पुस्तक वाचतोय, कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहोत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित राहावे असेही आवाहन त्यांनी केले आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रात थैमान घातला आहे. कोरोना व्हायरस आता भारतातही दाखल झाला असून आतापर्यंत 500 हून अधिकजण कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे समोर आले आहे. तसेच या व्हायरचा पासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

सध्या कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांनाच घरात बसावे लागत आहे. दरम्यान, राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडू यांनाही याचा फटका बसला आहे. प्रत्येक जण आपल्या घरात बसून नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यशशरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे घरात बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात बुद्धीबळाचा डाव रंगलेला दिसत आहे. या डावात शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना काही क्षणातच हारवल्याचे त्यांनी सांगितले आहे. "बाबांसोबत बुद्धीबळाचा डाव खेळणे सोपे नसते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्ही सर्वजण घरात आहोत. आम्ही दुपारी बुद्धिबळाचा डाव मांडला. थोड्या वेळातच बाबांनी आम्हा मायलेकींना हरवले.आम्ही पुस्तक वाचतोय,कुटुंबासोबत वेळ घालवतोय.तुम्हीही घरीच असा, सुरक्षित राहा" अशा आशायाचे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Coronavrius: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात 'हेल्पलाईन नंबर' ची घोषणा

ट्वीट-

भारतात कोरोना आजाराच उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचे ट्विट करून सांगितले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार यावरून चर्चा सुरू होती. अखरे पंतप्रधान मोदी यांनी कोरोना व्हायरसच प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करत असल्याची मोठी घोषणा केली. दरम्यान, ‘जनता कर्फ्यूने दाखवून दिले की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवले आहे. त्या राष्ट्रांकडे साधन नाहीत, असे नाही. पण, हा आजार इतक्या वेगाने पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे', अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे