Sharad Pawar 80th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संजय राऊत यांच्यासह मान्यवरांकडून शरद पवारांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण, कला, क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायमच केंद्रबिंदू राहिलेल्या शरद पवारांचा (Sharad Pawar) आज वाढदिवस आहे. 80 वर्ष पूर्ण करून 81 व्या वर्षामध्ये प्रवेश करणार्या शरद पवारांचा आजही राजकीय क्षेत्रातील दबदबा आणि काम करण्याचा हुरूप कायम आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकारणाच्या घडामोडीत आज शरद पवार हे नाव महत्त्वाचं झालं आहे. एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 ला बारामती मध्ये झाला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण, कला, क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान ट्वीटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताची गानकोकिळा लता मंगेशकर ते राजकीय नेत्यांमध्ये संकय राऊत, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहे. सोनिया गांधी यांच्या निवृत्तीनंतर शरद पवार होणार नवे UPA अध्यक्ष? प्रसारमाध्यमांमधून समोर येणाऱ्या वृत्तांचा NCP कडून खुलासा.
लता मंगेशकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी
सुप्रिया सुळे
संजय राऊत
शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे. सध्या शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये त्यांनी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी यांची मूठ बांधण्यात आली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्यासोबतीने ते राजकारणामध्ये उतरले. सुरूवातीला कॉंग्रेस, नंतर कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून त्यांची धुरा ते सांभाळत आहेत. या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक चढ-उतार पाहिला आहे.