Shantigiri Maharaj: महायुतीत मोठा ट्विस्ट! नाशिकमधून शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून भरला उमेदवारी अर्ज
मात्र काही जागांवर राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. यात नाशिकच्या जागेचा समावेश आहे. त्यातच आता शांतीगिरी महाराज यांनी नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याचे समोर आले आहे.
Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभा मतदार (Lok Sabha Election 2024) संघ सुरूवातीपासून चर्चेत राहीला आहे. 7 मे रोजी राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदार पार पडत आहे. मात्र, मतदानाची तारीखजवळ येऊनही महायुतीकडून त्यांचा नाशिकचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तिढा कायम असतानाच अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज शिवसेना शिंदेगट (Shivsena Shinde Group) कडून उमेदवारी अर्ज भरला आहे. (हेही वाचा : Praniti Shinde:पुलवामा हल्ल्यावरील 'त्या' विधानामुळे प्रणिती शिंदेंवर होणार कारवाई? भाजप कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार)
लोकसभा निवडणूकीसाठी देशभरात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. परिणामी महाराष्ट्रात महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याचे दौरे करत आहेत. यात राहुल गांधीही मागे नाहीत. अमरावती आणि सोलापूरमध्ये राहूल गांधींच्या प्रचारसभा पार पडल्या. दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सभा होत आहेत. दरम्यान, शांतीगिरी महाराज यांनी या आधी अपक्ष म्हणून निवडणुकीचा अर्ज भरला होता. आज गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.
मात्र, शांतीगिरी महाराजांनी अद्याप एबी फॉर्म दाखल केला नाही. त्याशिवाय, शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांनी उमेदवार फॉर्म भरल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
8">