Pune: साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या बायकोला महाबळेश्वरला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार; पीडितेची 5 लाख रुपयांची फसवणूक, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
पीडितेने आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांत धाव घेत आरोपी आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत
Pune: पुण्यातील पिंपरी येथून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका व्यक्तीने साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या बायकोला तिच्या मनाविरुद्ध महाबळेश्वर (Mahabaleshwar) नेऊन लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना घडली आहे. याशिवाय पीडितेकडून 5 लाखाहून अधिक पैसे उकळल्याचंही समोर आलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त प्रकाशित केलं आहे. पीडितेने आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांत धाव घेत आरोपी आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कुणाल संतोष चौधरी आणि संतोष चौधरी असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बाप-लेकाचं नाव आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल चौधरी आणि फिर्यादी यांचा 2 एप्रिल 2022 रोजी साखरपुडा झाला होता. यानंतर आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने महाबळेश्वरला फिरायला नेलं. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या मनाविरुद्ध तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. (हेही वाचा - Mumbai Shocker: नेहरू नगर परिसरामध्ये आढळला महिला सब इन्सपेक्टरचा मृतदेह)
याशिवाय, आरोपी आणि त्यांच्या वडिलांनी पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिला कर्ज काढायला भाग पाडले. पीडितेला कारण देऊन तिच्याकडून जवळपास 5 लाखाहून अधिक रक्कम घेतली. पीडितेने अनेकदा पैशाची मागणी करूनही आरोपींनी तिला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी तिच्यासोबत शुल्लक कारणावरून वाद घालू लागला.
तथापी, तुझ्यासोबत केवळ पैशासाठी लग्न करणार होतो, असंही आरोपीने पीडितेला सांगितलं. तसेच पुन्हा पैसे मागितल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बापलेकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2023 09:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

