Mumbai Shocker: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भांवावर गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना

तिन्ही भावांवर एका १५ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे

Rape Case | Pixabay.com

Mumbai Shocker: मुंबईत कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भावांवर लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही भावांवर एका 15 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी या प्रकरणी  दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे तर मोठा भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (हेही वाचा- सोशल मीडीयात मैत्री करून 21 वर्षीय आरोपीचा अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली. पीडितेने सांगितले की, तिन्ही भावांनी तिला लवकर येण्यास आणि कोचिंग सेंटरमध्ये उशिरा पर्यंत थांबवण्यास सांगितले आणि वारंवार अत्याचार केले. शनिवारी एका बाल विकास केंद्रात पीडितेने एका समुपदेशकाला या घटनेची माहिती सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांना माहिती मिळताच, दोन्ही भावांना अटक केले आहे. मोठा भाऊ फरार असून पोलिस सध्या त्याचा शोधात आहे.

24, 25 आणि 27 वर्षे वयोगटातील भाऊ दक्षिण मुंबईत राहतात आणि 7वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक कोचिंग इन्स्टिट्यूट चालवत होते, त्यांच्या वर्गात 35-40 मुली हजर होत्या, असं  पोलिसांना माहिती मिळाली.

समुपदेशकाने मुलीच्या आईला परिस्थितीची माहिती दिली, परंतु आई आणि मुलीने घाबरून ही गोष्ट पोलिसांना सांगितलीच नाही. मात्र, शुक्रवारी बालविकास केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतल अधिकृतपणे गुन्हा दाखल केला. आरोपांमध्ये भारतीय दंड संहितेअंतर्गत विनयभंग, अनैसर्गिक लैंगित संबंध आणि गुन्हेगारी धमकी तसेत लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO), 2012 मधील तरतुदींचा समावेश आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif