Sextortion Case Pune: पुण्यात सेक्स्टॉर्शन, दोघांची आत्महत्या; प्रकरणात राजस्थानातील गुरुगोठडी गावातील 2500 जणांचा समावेश असल्याची माहिती
सेक्सटोर्शन (Sextortion) प्रकाराला कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पुणे शहर पोलिसांनी (Pune City Police) या प्रकरणात अन्वर सुबान खान (Anwar Suban Khan ) या 29 वर्षी आरोपीला राजस्थान (Rajasthan) राज्यातील लक्ष्मणगड (Laxmangarh District) जिल्ह्यातील गुरुगोठडी (Gurugothdi) गावातून या आरोपीला अटक केली आहे.
सेक्सटोर्शन (Sextortion) प्रकाराला कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. पुणे शहर पोलिसांनी (Pune City Police) या प्रकरणात अन्वर सुबान खान (Anwar Suban Khan ) या 29 वर्षी आरोपीला राजस्थान (Rajasthan) राज्यातील लक्ष्मणगड (Laxmangarh District) जिल्ह्यातील गुरुगोठडी (Gurugothdi) गावातून या आरोपीला अटक केली आहे. अन्वर खान याला अटक केल्यानंतर हे प्रकरणी दिसतते तितके साधे नव्हे. या प्रकरणात केवळ एकदोन आरोपीच नव्हे तर अवघे एक गावच गुंतल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पुणे पोलीस आरोपीला अटक करत असताना गावकऱ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध केल्याचे वृत्त आहे. काही गावकऱ्यांनी पेलिसांवर दगडफेक केल्याचेही समजते.
पुणे पोलिसांच्या दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला अटक करून पाच मोबाईल जप्त केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, दत्तवाडी पोलिस ठाण्यात पोलिसांनी 12 ऑक्टोबर रोजी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, एका 19 वर्षीय तरुणाने सेक्सटॉर्शन (Sextortion) प्रकरणात खानकडून छळ झाल्याचा आरोप करून आत्महत्या केली. आरोपीने तरुणाकडे वारंवार पैशांची मागणी करत त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. (हेही वाचा, मुंबई मध्ये प्रतिष्ठित शाळेचे मुख्याध्यापक Sextortion च्या जाळ्यात, मेसेंजरवर न्यूड व्हिडिओ कॉल)
पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास 2500 लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत. हे लोक सोशल मीडियाच्या आधारे बनावट अकाउंट तयार करायचे त्याद्वारे लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा उद्योग करत असत. लोक जाळ्यात आले की, ते त्यांच्याकडचे अश्लिल फोटो मागत असत आणि ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळत असत.
तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) मदतीने केलेल्या तपासात आरोपी अलवर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक अक्षय सरोदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधीत ठिकाणी छापा टाकण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आरोपीला सहकार्य करण्यास सांगितले. परंतू, आरोपीने त्यास नकार दिला. पुणे पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी पोहोचताच, स्थानिक गुंडांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. पुणे पोलिसांच्या पथकातील दोघे जखमी झाले, मात्र मुख्य आरोपीला पकडण्यात त्यांना यश आले.
दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, "आमच्या पथकाने अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीत अनेक स्थानिक रहिवासी गुंतलेले असल्याचे अनुमान काढले. आम्ही आरोपींची चौकशी करणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी आमच्या पथकावर दगडफेक केली. आम्ही हल्ल्यातून स्वत:चा बचाव करण्यात यशस्वी झालो .
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)