Mira Road मध्ये सेक्स रॅकेट उधळलं; 5 जणांची सुटका एकीला अटक
एक 12 आणि 15 वर्षीय मुलींचा देखील समावेश आहे.
ठाणे (Thane) जिल्ह्यातील मीरा रोड येथील एका सेक्स रॅकेटला (Sex Racket) उधळताना पोलिसांनी एका महिलेला अटक करत 5 जणींची सुटका केली आहे. त्यापैकी एक मुलगी 12 वर्षांची आहे. हे धाडसत्र शुक्रवारी टाकण्यात आलेले आहे. अॅन्टी ह्युमन ट्राफिकिंग सेल (AHTC) यांना मिळालेल्या टीप वरून कारवाई केली आहे.
साईबाबा नगर मध्ये कारवाई करताना MBVV police च्या AHTC ने एका 22 वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही महिला सेक्स रॅकेट मधील एजंट होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे देखील वाचा: Sex Racket Busted in Thane: बोर्डवर स्पा सेंटर, आत सेक्स रॅकेट; ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश, व्यवस्थापकाला अटक.
पोलिसांच्या माहितीनुसार सुटका केलेल्या मुलींमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा देखील समावेश आहे. एक 12 आणि 15 वर्षीय मुलींचा देखील समावेश आहे. आयपीसी आणि पोक्सो अॅक्ट अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ऑक्टोबर महिन्यात वर्सोवा पोलिसांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली एका व्यावसायिकाला अटक केली आहे. त्याने एका महिलेच्या बहिणीला सेक्स रॅकेटमधून (Sex racket) बाहेर काढण्याचे आश्वासन देऊन 60.70 लाखांची फसवणूक केली आहे.