Sewri Shocker: अल्पवयीन मुलासोबत पळून गेलेल्या 18 वर्षीय मुलीचा जीर्ण रिकाम्या इमारतीमध्ये सापडला मृतदेह; खूनाचा गुन्हा दाखल

सध्या पोलिस अल्पवयीन मुलाची चौकशी करत असून त्याचा या प्रकारामध्ये काही हात आहे का? हे पाहत आहेत.

Representative Image

मुंबई (Mumbai)  मध्ये पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला प्रेयसीच्या खूनाच्या प्रकरणामध्ये अटक केली आहे. ही तरूणी मुलासोबत पळून गेली होती. शिवडी (Sewri) मध्ये एका जीर्ण रिकाम्या इमारतीमध्ये 18 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. ही घटना 2 सप्टेंबरची आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरूद्ध गुन्हा नोंदवून घेतला आहे.

रिपोर्ट्सनुसार, मृत तरूणी 15 वर्षीय मुलासोबत पळून गेली होती. दोघं शिवडी मध्ये एका रिकाम्या इमारतीमध्ये राहत होते. सोमवारी या तरूणीचा मृतदेह आढळल्याने हा प्रकार प्रकाशझोतात आला. पोलिसांनी हे दोघं सुमारे 2 आठवड्यांपूर्वी त्यांच्या घरामधून पळून गेल्याचं सांगितलं आहे.

रिकाम्या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर ते राहत होते. पोलिसांना ही तरूणी पाचव्या मजल्यावरून कोसळल्याची किंवा तिला ढकलण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अद्याप त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकारानंतर दोघांच्याही घरी घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे. नक्की वाचा: Pune Shocker: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या.

मृत तरूणीच्या आईने तिच्या मुलीच्या मृत्यूला अल्पवयीन मुलाला जबाबदार ठरवलं आहे. तर मुलाने हा प्रकार घडला तेव्हा आपण झोपलो असल्याचं म्हटलं आहे. उठल्यानंतर तिची शोधाशोध करता त्याला तरूणी तळ मजल्यावर कोसळल्याचं समजलं. घडला प्रकार बघून घाबरून तो बहिणीच्या घरी कळव्याला पोहचला.

प्राथमिक तपासामध्ये पोलिसांना दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते आणि यापूर्वीदेखील त्यांनी पळून गेल्याचं सांगितलं आहे. सध्या पोलिस अल्पवयीन मुलाची चौकशी करत असून त्याचा या प्रकारामध्ये काही हात आहे का? हे पाहत आहेत.