Palghar: पालघर मधील सात मच्छिमार पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात, मच्छिमार खलशांची कुटुंब मोठ्या अडचणीत

सरकारने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या खलाशांची सुटका करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे .

प्रतिकात्मक फोटो | (Photo Credits: Twitter/ ANI)

पालघरमध्ये (Palghar) मोठ्या प्रमाणावर कोळी बाधव वास्तव्यात आहेत. त्यातील अनेकांचा मासेमारी (Fishing) हाच प्रमुख व्यवसाय (Occupation) आहे. मासेमारीच्या माध्यमातून अनेक खलाशी आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करतात. मासेमारीसाठी अनेक खलाशी खोल समुद्रात जातात पण दरम्यान या खलाशांना पाकिस्तान (Pakistan) सैन्याने ताब्यात घेतले आहे. महिनाभरापूर्वीच ओखा बंदरातील (Okha Port) एका मासेमारी बोटीवर रोजगारासाठी गेले होते. पालघर मधील  भागातील शेकडो कामगार स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने गुजरातकडे (Gujarat) धाव घेतात. यातील अनेक कामगार हे आजही पाकिस्तानी सैन्याच्या (Pakistan Army) ताब्यात आहेत. त्यामुळे सरकारने (Government) आता पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या खलाशांची सुटका करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे .

 

यात असलेला धोका लक्षात येऊनही रोजगारासाठी येथील अनेक कुटुंब प्रमुख मासेमारीसाठी बोटींवर खलाशी म्हणून जातात. कुटुंबातील कमावता कर्ता पुरुषच पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याने ही कुटुंब सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहेत.   घराची आर्थिक घडी चालवणारा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने घर खर्च आणि मुलांचा खर्च करायचा कसा असा गंभीर प्रश्न या महिलांसमोर उभा राहिलाय.  तरी घरातील पुरुष पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यानं कुटुंबियांना धसका बसला आहे. (हे ही वाचा:- Mumbai: चप्पलमध्ये लपवले 4.9 कोटी रुपयांचे कोकेन, तस्करी प्रकरणात महिलेला मुंबई विमानतळावर अटक)

 

पाकिस्तानने ताब्यात घेतलेले खलाशी डहाणू भागातील आहेत. नवश्या भीमरा , विजय नागवंशी , सरीत उंबरसाडा , जयराम साळकर , कृष्णा बुजड , विनोद कोल , उधऱ्या पाडवी अशी या सात खलाशींची नावं आहेत. तरी सरकार यावर काय पाऊल उचलनार हे बघणं महत्वाच ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif