Pet Dog Beaten By Servant In Versova: वर्सोवामध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये नोकराची पाळीव कुत्र्याला बेदम मारहाण; घटना CCTV मध्ये कैद
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा कुत्रा परिसरातील रहिवासी श्रीयांशी जैन यांचा आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण कुत्र्याला गळ्यातील पट्ट्याने मारताना दिसत आहे.
Pet Dog Beaten By Servant In Versova: मुंबईतील वर्सोवा (Versova) येथे एका घरकाम करणाऱ्या नोकराने अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये एका पाळीव कुत्र्याला बेदम मारहाण (Pet Dog Beaten By Servant) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा कुत्रा परिसरातील रहिवासी श्रीयांशी जैन यांचा आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण कुत्र्याला गळ्यातील पट्ट्याने मारताना दिसत आहे. तसेच कुत्र्याला लिफ्टमधून बाहेर काढताना तरुणाने लाथ मारल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करणाऱ्याने पोस्टमध्ये म्हटलं आगे की, 'हे क्रूर कृत्य हे आठवण करून देते की प्राण्यांवर अत्याचार कुठेही होऊ शकतात, अगदी सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणीही. हे फक्त माझ्या कुत्र्याबद्दल नाही; ते सर्व आवाजहीन प्राण्यांबद्दल आहे जे स्वतःसाठी बोलू शकत नाहीत. परंतु, आपण त्यांचा आवाज बनला पाहिजे.' (हेही वाचा - Mumbai Local Ladies Coach Fight Video: मुंबई लोकल मध्ये महिलांच्या डब्ब्यात झिंज्या उपटत तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाकडू तपास सुरू)
वर्सोवा येथे लिफ्टमध्ये नोकराकडून पाळीव कुत्र्याला बेदम मारहाण -
हा व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्यांने लोकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना घरगुती कर्मचारी आणि त्यांच्या सभोवतालच्या इतरांकडून कसे वागवले जाते यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, व्हिडिओला उत्तर देताना, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी टिप्पणी केली की श्रियांसी जैन सध्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आहे. मी तिच्या नोकराविरुद्ध क्रूरतेच्या गंभीर कृत्याबद्दल तक्रार दाखल करण्यास तिला मदत करत आहे. न्याय मिळावा यासाठी आम्ही कायदेशीर पावले उचलत आहोत.