Harischandra Chavan Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन

चव्हाण हे प्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.

Harischandra Devram Chavan (फोटो सौजन्य - फेसबुक)

Harischandra Chavan Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण (Harischandra Devram Chavan) यांचे आज सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. हरिश्चंद्र चव्हाण हे 73 वर्षांचे होते. हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय प्रवासाला पेठ-सुरगाणा आदिवासी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून सुरुवात केली. चव्हाण हे प्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.

नंतरच्या काळात हरिश्चंद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून काम केले. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. याशिवाय, त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आणि त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. (हेही वाचा - Pandit Ram Narayan Passes Away: प्रसिद्ध सारंगी वादक पंडित राम नारायण यांचे निधन; 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

आदिवासींच्या उत्थानासाठी प्रामाणिकपणे काम करणारा नेता त्यांच्या निधनाने आपण गमावला - देवेंद्र फडणवीस 

हरिश्चंद्र चव्हाण यांचे पार्थिव आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्या नाशिक येथील निवासस्थानी सर्वांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, मुलगा समीर आणि मुलगी स्नेहल असा परिवार आहे.