खुशखबर! आता मुंबई मधील खड्डे बुजणार 24 तासांत; फक्त पाठवावा लागेल फोटो, जाणून घ्या WhatsApp Number

यासाठी फक्त त्या खड्ड्याचा फोटो पालिकेने जारी केलेल्या व्हॉटस्ऍप नंबरवर पाठवायचा आहे.

Mumbai pothole ridden roads. (Photo credits: PTI)

राज्यात जवळजवळ सर्व ठिकाणी पावसाचे आगमन झाल्याने, आग ओकणाऱ्या सूर्यापासून सुटका मिळाली आहे. लवकरच महाराष्ट्रात मान्सूनचेही (Monsoon)आगमन होईल. पावसाळ्यात नागरिकांना सर्वात जास्त त्रास होतो तो रस्त्यावरील खड्ड्यांचा (Pothole). म्हणूनच पालिकेने पावसाळापूर्व कामे आटोपण्याचा वेग वाढवला आहे. आता तुम्हाला जर का रस्त्यात खड्डा दिसला तर तो अवघ्या 24 तासांत बुजवला जाणार आहे. यासाठी फक्त त्या खड्ड्याचा फोटो पालिकेने जारी केलेल्या व्हॉटस्ऍप नंबरवर पाठवायचा आहे.

दरवर्षी मुंबईमध्ये रस्त्यावरील खड्डे, त्यामुळे साचणारे पाणी, जमा होणारा कचरा असे चित्र दिसते. मात्र यावर्षी पालिका एक महत्वाचा उपक्रम राबवणार आहे. आता यावेळी तुम्हाला रस्त्यात कुठेही खड्डा दिसला तर त्याचा फोटो तुम्हाला पालिकेला पाठवायचा आहे. यासाठी पालिकेने एक 24x7 व्हॉटस्अॅप नंबर जारी केला आहे. सर्व 24 वॉर्डमधील रस्ते अभियंत्यांचे व्हॉटस्ऍप क्रमांक जाहीर केले आहेत. यावर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कमी होण्यासाठी पालिकेने MCGM 24×7 हे मोबाईल अॅपही सुरू केले आहे. (हेही वाचा: ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पलटी झाल्याने ३१ वर्षीय ठाणेकराचा मृत्यू)

हे आहेत विविध वॉर्डसाठी व्हॉटस्अॅप नंबर -

या नंबरवर खड्डय़ाचा फोटो पाठवा

ए – 8879657698

बी – 8879657724

सी – 8879657704

डी -8879657694

ई – 8879657712 n

एफ-उत्तर – 8879657717

एफ-दक्षिण – 8879657678

जी-उत्तर – 8879657683

जी-दक्षिण – 8879657693

के-पूर्व -8879657651

के-पश्चिम – 8879657649

पी-दक्षिण – 8879657661

पी-उत्तर-  8879657654

आर-दक्षिण-  8879657656

आर-उत्तर- 8879657636

आर-मध्य – 8879657634

एल – 8879657622, 8879657610

एम-पूर्व – 8879657622, 8879657615

एम-पश्चिम – 8879657608

एन – 8879657617

एस – 8879657603

टी – 8879657609