Selu Municipal Council: मालेगावचा वचपा सेलूत काढला, राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षासह २० नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश

असाच खेळ महाविकासआघाडी सरकारमधील दोन घटक म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या पक्षांमध्ये रंगला आहे. सेलू नगरपरीषदेच्या (Selu Municipal Council) नगराध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जवळपास 20 नगरसेवकांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

NCP, Congress | (Photo credit: Archived, edited, representative images)

राजकारण म्हणजे शह काटशहांचा खेळ. असाच खेळ महाविकासआघाडी सरकारमधील दोन घटक म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या पक्षांमध्ये रंगला आहे. सेलू नगरपरीषदेच्या (Selu Municipal Council) नगराध्यक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जवळपास 20 नगरसेवकांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील काँग्रेस मुख्यालय असलेल्या टीळक भवन येथे मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगाव नगरपालीकेत केलेल्या खेळीचा वचापा काँग्रेसने सेलू येथे काढल्याची चर्चा या पक्षप्रवेशाने सुरु झाली आहे.

दरम्यान, सेलू नगरपरीषदेचे नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसोबतच नांदेड, औरंगाबादमधील राष्ट्रवादीच्या महत्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसचा हात हातात घेतला. सेलू नगरपरीषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती. मात्र, नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे पक्षविस्तार करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Malegaon Municipal Corporation: मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा सुफडा साफ, 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश)

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मालेगाव येथील जवळपास 28 नगरसेवक, नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे अनेक पदाधीकारी यांचा प्रवेश करवून घेतला होता. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला होता. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते की, आम्हीही या प्रकारला जशास तसे उत्तर देऊ. आपले वक्तव्य खरे करत नाना पटोले यांनी परभणी, औरंगादाबाद, नांदेड येथे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडले आहे. यासोबच परभणीतल्या जिंतुर आणि सेलु नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह इतर नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश घडवून आणला आहे.