Akola Violence: अकोला मध्ये सोशल मीडीयातील वादाग्रस्त पोस्ट वरून दोन गटांत राडा; एकाचा मृत्यू, कलम 144 लागू
अकोला मध्ये धार्मिक नेत्याबाबत काही आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर वातावरण पेटल्याचं शनिवारी रात्री पहायला मिळालं होतं पण सध्या स्थिती नियंत्रणामध्ये आहे.
अकोला (Akola) मध्ये सोशल मीडीयातील एका पोस्ट मुळे राडा झाल्याची घटना समोर आली आहे. एका तरूणाच्या सोशल मीडीयात धार्मिक पोस्ट मुळे दोन समुदयांमध्ये तुफान राडा झाला आहे. हरिहरपेठ परिसर मध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कलम 144 लागू केलेला आहे. दोन गटात झालेल्या मारामारीमुळे एकाचा मृत्यू देखील झाला आहे. दरम्यान या राड्यात हाणामारीसोबत मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्ययत आली आहे.
अकोलामधील या दंगलीच्या मागे कारणीभूत असलेल्या पोस्ट च्या युजर्सवर रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका पोस्ट मुळे वातावरण चिघळलं आणि 2 गटात राडा झाला. यामध्ये काही वाहनांचं नुकसान झालं आहे तर 10 जण जखमी आहेत. त्यात 8 नागरिक आणि 2 पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांनी सध्या नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे देखील आवाहन केले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 26 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. Akola: अकोला जिल्ह्यातील बाळापूर गावात 'मन' नदीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू .
पहा ट्वीट
अकोला मध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असली तरीही पुढे परिस्थिती चिघळू नये म्हणून बुलढाणा, वाशिम,अमरावती मधूनही अधिकची कुमक बोलावण्यात आली आहे.