Nanded Rain: नांदेड जिल्ह्यातील खैरगाव येथे पुराच्या पाण्यात अडकले शालेय विद्यार्थ्यी, 25 हून अधिक विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

पुरात अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना बचावण्यासाठी बचाव मोहीम राबवण्यात आली.

Photo Credit -X

Nanded Rain: नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातही मुसळधार पावसाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. खैरगाव येथे मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात काही शालेय विद्यार्थी अडकले. शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी बचाव मोहीम राबवली. यात 25 हून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. सुदैवाने कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. (हेही वाचा:Nashik Anjaneri Fort: अंजनेरी गडावर अडकलेल्या 200 जणांची सहा तास रेस्क्यू ऑपरेशननंतर सुटका )

व्हिडीओ पहा

राज्यात सध्या पावसाचा जोर चांगलात वाढला आहे. या पावसामुळे धरणे, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसात अनेक अपघात देखील घडत आहे. नाशिकच्या अंजनेरी गडावर (Anjaneri fort) पर्यटक अडकल्याची घटना घडली आहे. पावसाचा जोर वाढल्याने तब्बल 200 पर्यटक गडावर अडकले होते. या पर्यटकांसाठी सहा तास रेस्क्यू ऑपरेशन राबवल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात यश आलं आहे. अमरावतीत झालेल्या मुसळधार पावसामुळे लाल खारी भागातील अंबा नाला तुडुंब भरला त्यात 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला. दुसरी घटना धामणगाव तालुक्यातून उघडकीस आली आहे. ज्यामध्ये दोन महिलांवर वीज कोसळली.