Maharashtra School Start Date: राज्यभरातील शाळा आजपासून सुरु, विदर्भात मात्र 27 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार
अपवाद फक्त विदर्भाचा आहे. विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरु होणार आहेत.
Maharashtra School Start Date: कोरोन व्हायरस (कोरोन व्हायरस, Coronavirus) महामारीनंतर प्रदीर्घ काळानंतर महाराष्ट्रातील शाळा पूर्ण क्षमतेने नियोजीत कार्यक्रमानुसार आजपासून (13 जून) सुरु होत आहेत. अपवाद फक्त विदर्भाचा आहे. विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरु होणार आहेत. कोरोना काळात सर्वाधिक परिणाम हा शाळांवर झाला. शाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने शाळांना ऑनलाईन वर्ग आयोजित करावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील थेट संपर्क पूर्णपणे खंडीत झाला होता. त्यामुळे आजपासून हा संपर्क पुन्हा एकदा नव्याने सुरु होणार आहे. 15 जून पासून खऱ्या अर्थाने शैक्षणीक वर्ष 2022-23 (Academic Year 2022-23) सुरु होणार आहे.
राज्यातील शाळा केव्हा सुरु होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, राज्याच्या शिक्षण विभागाने या संदर्भात माहिती देणारे एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकात शाळा 13 जूनपासून सुरु होतील असे म्हटले होते. राज्यभरातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष 15 जूनपासूनच बोलावले जाणार आहे. (हेही वाचा, Maharashtra School Update: राज्यात Covid-19 रुग्णांमध्ये वाढ; शाळा सुरु होण्याबाबत मंत्री Varsha Gaikwad यांनी दिली महत्वाची माहिती)
विद्यार्थ्यांना शाळेत बोलवेपर्यंत 13 आणि 14 जून असा दोन दिवसांचा कालावधी मिळतो आहे. या काळात शाळा व्यवस्थापणाने शाळेची स्वच्छता, सौंद्यर्यीकरण, आवश्यक गोष्टींची पूर्तता, कोरोना संदर्भात घ्यावयाच्या पूर्वतयारीची काळजी घ्यायची आहे.
रज्यातील शाळा सुरु होण्याबाबत शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष 2022/23 सुरु होणार आहे. राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे उन्हाची काहीलीही काहीशी कमी झाली आहे. परिणामी तापमान कमी झाले आहे. त्यामुळे शाळा 15 जूनपासून सुरु होत आहेत. दरम्यान, विदर्भात मात्र अद्यापही पाऊस आला नाही. तापमान चढेच आहे. परिणामी तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. विदर्भ वगळता राज्यभरातील विद्यार्थी 15 जूनपासून शाळेत प्रत्यक्ष हजर असतील. तर विदर्भातील विद्यार्थी 27 जूनपासून शाळेत हजर असतील.