School Holiday Tomorrow August 1: महाराष्ट्रात पावसाचा कहर; शाळांना उद्या सुट्टी?

ज्या भागात नदी, नाले दुथडीभरून वाहत आहेत तेथे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

School Holiday Tomorrow August 1: महाराष्ट्रात पावसाचा कहर; शाळांना उद्या सुट्टी?

मुंबई, पुणे, नाशिक नंतर आता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विदर्भ, मराठवाडा भागातही पावसाने जोर धरला आहे. आयएमडीने वर्तवलेल्या इशार्‍यानुसार आता राज्यात सर्वदूर  जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरू आहे. मागील आठवड्यापर्यंत पावसाच्या प्रतिक्षेत असलेला विदर्भाचा अनेक भागही आता जलमय झाला  आहे. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. काही भागात गावांचा संपर्क तुटला आहे. वीजपुरवठा खंडीत असल्याने जनजीवन विस्कळीत असल्याचं चित्र आहे. नक्की वाचा: उद्याचे हवामान महाराष्ट्र: 1 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि साताऱ्यात पावसाची स्थिती .

शाळांना 1 ऑगस्टला सुट्टी मिळणार का?

महाराष्ट्रात शाळांना सुट्टी देण्याचे अधिकारी जिल्हा स्तरावर दिले जातात. जिल्हाधिकारी पाऊसपाण्याचा अंदाज घेऊन शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय जारी करतात. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक भागात स्थिती नियंत्रणात असल्याने शाळांना सुट्टी जाहीर झालेली नाही. उद्या 1 ऑगस्ट दिवशी देखील ही सुट्टी जाहीर झालेली नाही. पण अनेक शाळांना शनिवार हा विकेंड असल्याने सुट्टी असतेच.

आज अमरावतीमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या भागात तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस झाला असून तालुक्यातील लिंबा गणेश, माजलगाव तालुक्यातील गंगामसला, केज तालुक्यातील हनुमंत आणि नांदूरघाट, तसेच धारूर तालुक्यातील मोहखेड आणि अंजनडोह परिसरात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 1 ऑगस्ट उद्याचे हवामान अंदाज

हवामान विभागाकडून वाशीमला पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ज्या भागात नदी, नाले दुथडीभरून वाहत आहेत तेथे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2026 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).