Maharashtra Scholarship Exam Results 2019: 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहीर; puppss.mscescholarshipexam.in वर पहा शिष्यवृत्तीधारकांची यादी
यामध्ये 5 वी चे 16,589 तर 8 वी च्या 14,815 विद्यार्थी आहेत.
5 and 8 th std Scholarship Exam Results 2019: स्कॉलरशीप परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाल्यानंतर 5 वी आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये अंतिम निकाल आणि शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीची प्रतिक्षा होती. आज मंडळाकडून अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीचे एकूण 31, 394 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहे. यामध्ये 5 वी चे 16,589 तर 8 वी च्या 14,815 विद्यार्थी आहेत. तुमचा निकालही मंडळाच्या mscepune.in आणि puppss.mscescholershipexam.in या संकेतस्ठळावर पाहता येईल. महाराष्ट्र: 5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 26 चुकीचे प्रश्न वगळून लावणार निकाल! उत्तरसूची www.mscepune.in वर प्रसिद्ध
स्कॉलरशीपचा अंतिम निकाल कुठे आणि कसा पहाल?
- puppss.mscescholarshipexam.in या वेबसाईट वर उजव्या बाजूला शिष्यवृत्ती निकाल फेब्रुवारी 2019 चा पर्याय आहे.
- या पर्यायावर तुम्हांला विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. त्यासोबतच शाळांना अंतिम निकाल या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर रोल नंबर, आईचं नाव एन्टर करून सबमीट करा
- स्क्रिनवर तुम्हांला निकाल पाहता येईल
5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्तीधारक गुणवंतांची संपूर्ण गुणवत्ता यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा . विद्यार्थ्यांसोबतच शाळांनाही त्यांचा आज निकाल पाहता येणार आहे. सोबत शिष्यवृत्ती धारकांची यादी पाहता येणार आहे. संचनिहाय महाराष्ट्रभरातील कटऑफ लिस्टदेखील वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.