पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाबद्दल 15 जुलैला होणार सर्वोच्च न्यायालयात अंतरिम सुनावणी

दरम्यान मराठा आरक्षणावर बुधवार, 15 जुलै दिवशी अंतरिम आदेश निघण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात सुनावणी (Photo Credits-File Image)

मराठा आरक्षणाबद्दल आज सर्वोच्च न्यायालयात होणार्‍या सुनावणीकडे सार्‍यांचंच  लक्ष लागलं होतं.  दरम्यान आजची सुनावणी पूर्ण झाली असून आता पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षणाबद्दल 15 जुलैला निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान 31 जुलै पर्यंत पदव्युत्तर मेडिकल अ‍ॅडमिशनची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे.  त्यामुळे आता मराठा आरक्षणावर बुधवार, 15 जुलै दिवशी अंतरिम आदेश निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने 5 घटनापीठांकडे प्रकरण देण्याची मागणी केली होती. त्याबाबत नंतर निर्णय होणार आहे.

वैद्यकीय आरक्षणाबद्दल सविस्तर सुनावणी पुढील महिन्यात सुरू होईल. मात्र 15 जुलैला अंतरिम आदेश निघणार आहे. या ऑनलाईन सुनावणी मध्ये खासदार संभाजीराजे कोल्हापूर मधून  उपस्थित होते. त्यांनीदेखील सहभाग घेतला होता. त्यांनी माहिती देताना ऑनलाईन ऐवजी फिजिकल सुनावणी केली जाणार आहे.जाणं अधिक सोयीस्कर असेल असे मीडियासमोर बोलताना स्पष्ट केले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र  सरकारने राज्यात 1 डिसेंबर 2018 पासून मराठा आरक्षण विधेयक लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या आरक्षणानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली होती. ही तरतूद मराठा आरक्षण विधेयकात आहे. ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याचे या विधेयकात म्हटले आहे.