Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता बायोमेट्रिक प्रणालीद्वारे मिळणार प्रवेश
काही वेळ पुणे विद्यापीठात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना दोन गटामध्ये गोंधळ आणि हाणामारी झाल्याचं बघायला मिळत आहे. भाजप युवा मोर्चा आणि एसएफआय या दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली. यानंतर आता सावित्रीबाई फुले विद्यापीठात झालेल्या गोंधळानंतर विद्यापीठात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुणे विद्यापीठात आता प्रवेशावर बंधनं घालण्यात आली असून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे विद्यापीठ परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. (हेही वाचा - Pune Crime News: कर्मचाऱ्याने पगार मागितल्यावर केली मारहाण, पुण्यातील तरुणाचा मृत्यू)
दरम्यान दोन गटांमध्ये राडा झाला त्यानंतर विद्यापीठात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि बाकी उपस्थितांनीदेखील या गोंधळात मध्यस्थी करण्याता प्रयत्न केला मात्र तरीही तीव्रता कमी झाली नाही. त्यामुळे असे गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे विद्यापीठ परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणे विद्यापीठात होणारे गोंधळ आणि अनुचित प्रकार कमी होण्याची शक्यता आहे.
पुणे भाजप युवा मोर्चा आणि स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला होता. काही वेळ पुणे विद्यापीठात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांकडून या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र दोन्ही गट आक्रमक झाल्याने दोन्ही गटाची कार्यकर्ते पोलिसांचं ऐकण्याच्या तयारी दिसत नव्हते आहे शिवाय पुणे भाजप युवा मोर्चाच्यावतीने काही डाव्या संघटनेचे झेंडेदेखील जाळण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 8 नंबरच्या वसतीगृहातील पार्कींगमध्ये काळ्या रंगाने आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे.त्यानंतर विद्यापीठातील वसतीगृहातील संपूर्ण परिसर मोकळा केला आहे. या ठिकाणी कोणालाही जाण्यास आता विद्यापीठ प्रशासनाकडून बंदी करण्यात आली आहे.