Manas Pagar Last Rites: सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय मानस पगार याचं अपघाती निधन; सुधीर तांबेंनी लेकाचा MLC Election निकाल सोडून मानसच्या अंत्यविधीला हजेरी

मानसच्या निधनाचं वृत्त समजताच सत्यजित तांबे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी हळहळ व्यक्त केली आहे.

Manas Pagar | Twitter

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत ऐनवेळेस ट्वीस्ट आणणार्‍या सुधीर तांबे, सत्यजित तांबे या पिता-पुत्रांना आज निकालाच्या दिवशी देखील मोठा वैयक्तिक धक्का बसला आहे. सत्यजित तांबे यांचे निकटवर्तीय आणि उमदं नेतृत्त्व मानस पगार (Manas Pagar) यांचं काल रात्री अपघाती निधन झालं. नाशिकला जात असतानाच त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने या अपघातात मानस पगार यांचे निधन झाले आहे. या कठीण प्रसंगामध्ये सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी मतमोजणीच्या ठिकाणा ऐवजी मानसच्या अंत्यविधीला उपस्थितीला लावली आहे.

मानस पगार हे नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आज मानस पगार यांच्या पार्थिवावर पिंपळगाव बसवंत या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

नाशिक-मुंबई महामार्गावरील कन्नमवार पुलाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली आणि त्यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. मानस यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले पण तो पर्यंत उशिर झाला होता. दरम्यान मानस यांचे काही सहकारी या अपघातामध्ये जखमी आहेत. नक्की वाचा: Satyajeet Tambe: सत्यजित तांबे यांच्या समर्थकांचे गुडघ्याला बाशिंग; निकालापूर्वीच झळकावले विजयाचे बॅनर .

सत्यजित तांबे यांचं ट्वीट

मानसच्या निधनाचं वृत्त समजताच सत्यजित तांबे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी हळहळ व्यक्त केली आहे.