Nawab Malik आजारी असल्याचं PMLA provisions खाली पटवून द्या; Bombay High Court मध्ये तातडीच्या जामिनासाठी अर्ज केलेल्या मलिकांना निर्देश
62 वर्षीय मलिकांनी बॉम्बे हाय कोर्टात 30 नोव्हेंबरला जामीनासाठी अर्ज केला आहे.
Bombay High Court मध्ये तातडीने जामीनासाठी अर्ज केलेल्या एनसीपी नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना कोर्टात ते PMLA provisions खाली आजारी असल्याचं दाखवावं लागणार आहे. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्यासमोर झालेल्या सुनावणी त्यांच्या वकिलांना आधी मलिक आजारी असल्याचं कोर्टाला पटवून द्या त्यानंतर वैद्यकीय कारणावर जामीन देण्याबाबत विचार केला जाईल असं म्हटलं आहे. आता मलिकांच्या जामीनावरील पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत पुढे गेली आहे.
नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाली आहे. ईडी ने त्यांच्या विरुद्ध कारवाई करत गॅंगस्टर दाऊद इब्राहिम सोबत त्यांचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती कर्णिक यांनी मलिकांच्या वकिलांना 'आधी मला मलिक आजारी असल्याचं पटवून द्या. त्यानंतर मी तातडीने वैद्यकीय कारणावर जामीन देण्याबाबत विचार करेन अन्यथा तुमच्या नियमित सुनावणीनुसार जामीनाच्या याचिकेवर सुनावणी होईल. सध्या खंडपीठासमोर अन्य देखील अनेक महत्त्वाच्या याचिका असल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
मुंबई उच्च न्यायालयातील खंडपीठाने मलिक यांचे वकील अमित देसाई आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग, यांनी ईडीकडे हजर राहून, मनी लाँडरिंग विरोधी कायद्याच्या तरतुदीनुसार "आजारी व्यक्ती" कोण असते यावर युक्तिवाद करण्यास सांगितले आहे.
अमित देसाई यांनी माजी मंत्री अनिल देशमुखांच्या जामीना संदर्भ देत त्या धर्तीवर मलिकांनाही जामीन देण्याबाबत अर्ज दिला आहे. आता यावर 21 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होईल.
नवाब मलिक सध्या किडनीच्या आजाराने त्रस्त असून मुंबईतील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. 62 वर्षीय मलिकांनी बॉम्बे हाय कोर्टात 30 नोव्हेंबरला जामीनासाठी अर्ज केला आहे.