IPL Auction 2025 Live

सातारा येथे ट्रॅव्हल बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

तर पुणे-बंगळुरु महामार्गावर ही दुर्घटना झाली असून या मध्ये जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

सातारा (Satara) येथे ट्रॅव्हल बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. तर पुणे-बंगळुरु महामार्गावर ही दुर्घटना झाली असून या मध्ये जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ट्रॅव्हल बसमधील 20 जण जखमी झाले आहेत.

कोल्हापूरच्या दिशेने एक ट्रक जात होता. या ट्रकच्या बरोबर मागेच ट्रॅव्हल बस होती. परंतु सातारा येथे उतार असलेल्या ठिकाणी ट्रकचे टायर फुटले आणि चालकाने गाडी जागेवरच थांबवली. परंतु मागून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल बसची धडक या ट्रकचा बसल्याने अपघात झाला आहे.(पुणे: दारूच्या नशेत ट्र्क चालकाची दुचाकी स्वारांना धडक; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी)

ANI ट्वीट:

या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू आणि 20 प्रवासी जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी कर्नाटक येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.