सातारा: आईवरच केला पोटच्या मुलाने बलात्कार, आरोपीला अटक

(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

सातारा (Satara) येथे पोटच्या पोराने आपल्याच आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. तसेच वडिलांनी या प्रकरणी मध्ये पडले असता त्यांनासुद्धा दगडाने मारले असल्याचा विचित्र प्रकार आरोपी तरुणाकडून करण्यात आला आहे.

आरोपी मुलाची आई आणि वडिल हे एका लग्नासाठी गेले होते. परंतु काही वेळाने मुलाची आई एकटीच घरी परतली. त्यावेळी मुलाने आई घरात येताच घराचा दरवाजा बंद करत तिच्यावर प्रथम जबरदस्ती करुन बलात्कार केला. पीडित महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता याची महिती वडिलांना देण्यात आली.(पुणे: शिक्षकाकडून 6 महिन्यांपासून 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार)

तर वडिलांनी मुलाला यामागील कारण विचारल्यास त्यांना सुद्धा दगडाने मारहाण केली. या प्रकरणी पीडित महिलेने तिच्यासोबत झालेला प्रकाराची तक्रार पोलिसात केली असता आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.