Yavateshwar Ghat Accident: यवतेश्वर घाटात दोन कारचा अपघात, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू
यवतेश्वर घाटात दोन कारमध्ये जोरदार धडक झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास अपघात घडून आला आहे.
Yavateshwar Ghat Accident: साताऱ्यातील (Satara) यवतेश्वर घाटात काल रात्री नऊ वाजताच्या सुमारात भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ४ जण जखमी झाले आहे. जखमी लोकांना पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रात्रीच्या सुमारास दोन गाड्यांनी धडक दिली आणि हा अपघात घडून आला. रस्त्यावर या अपघातामुळे काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या नऊच्या सुमारास यवतेश्वर घाटात होंडा सिटी आणि क्रेटा यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भंयकर अपघातामुळे तरुणीचा मृत्यू झाला. आणि ४ जणांना गंभीर जखमा झाल्या आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णायलात दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावरील इतर प्रवाशांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. आणि अपघाताची नोंद घेतली.
गायत्री समीर आहेरराव असे या अपघात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. हा अपघात नेमके कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या अपघातामुळे परिसरात खळबळ माजली आहे. रात्री रस्त्यावर मुसळधार पाऊस असल्यामुळे अपघात घडून आला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2023 07:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

