Satara Accident News: सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे भीषण अपघात, दोन ठार, एक गंभीर जखमी
मृतांपैकी दोघे जण हे दहीवडी (Dahivadi) येथील असल्याचे समजते. हा अपघात सातारा जिल्ह्यातील दहिवडी-फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील वळणावर बुधवारी (1 डिसेंबर) मध्यरात्री दीड वाजणेच्या सुमारास घडला.
ट्रक आणि स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात (Satara Accident News) दोघे जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृतांपैकी दोघे जण हे दहीवडी (Dahivadi) येथील असल्याचे समजते. हा अपघात सातारा जिल्ह्यातील दहिवडी-फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील वळणावर बुधवारी (1 डिसेंबर) मध्यरात्री दीड वाजणेच्या सुमारास घडला. रात्रीची वेळ असल्यामुळे या दुर्घटनेबद्दल तातडीने कोणालाच माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घटना निदर्शनास आली. त्यानंतर स्थानिकांनाही घटनेबाबत माहिती कळली. स्थानिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
प्राप्त माहितीनुसार पियुष शैलेंद्र खरात (वय 22), स्वयंम सुशिल खरात (वय 16) आणि अक्षय दीपक खरात हे तिघे स्विफ्ट कारमधून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास फलटणवरुन दहिवडीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, त्याची कार दहिवडी-फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील वळणावर आली. याच वेळी एक ट्रक दहिवडीकडून फलटनच्या दिशेने निघाला होता. ही दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांना धडकली. ही धडक इतकी भायावह होती की, यात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला. तर ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. (हेही वाचा, Solapur Pune Highway Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच ठार, सहा गंभीर जखमी)
या भीषण अपघातात पियुष आणि स्वयम हे दोघे जागीच मृत्यूमुखी पडले. तर अक्षय हा तरुण गंभीर जखमी झाला. स्थानिकांना या अपघाताबाबत माहिती मिळताच त्यांनी अक्षय यास जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समजते. पोलिसांनी घटनेची नोंद घेत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.