Satara News: फरशी पुसताय? काळजी घ्या! सातारा येथे नऊ महिन्यांच्या बाळाचा फिनेलच्या वासामूळे गुदमरून मृत्यू
पण, सावधगिरी आणि काळजी या दोन्ही गोष्टी कोणत्याही कामात महत्त्वाच्या ठरतात. सातारा जिल्ह्यतील खंडाळा तालुक्यात येणाऱ्या मोर्वे गावात घडलेल्या हे प्रकर्शाने पुढे आले आहे.
फरशी पुसत (Floor Mopping) असाल तर सावधान! असे जर कोणी म्हणाले तर 'त्यात काय सावधान, फरशी तर आम्ही दररोजच पुसतो' असे उत्तर येण्याची शक्यता आहे. पण, सावधगिरी आणि काळजी या दोन्ही गोष्टी कोणत्याही कामात महत्त्वाच्या ठरतात. सातारा जिल्ह्यतील खंडाळा तालुक्यात येणाऱ्या मोर्वे गावात घडलेल्या हे प्रकर्शाने पुढे आले आहे. येथील नऊ वर्षाच्या मुलाचा फरशी पुणसण्याच्या फिनेलचा उग्र वास (Smell Of Phenol Liquid) सहन न झाल्याने गूदमरुन (Suffocation) मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अवघ्या मोर्वे गावाला धक्का बसला आहे.
घटनेबद्दल माहिती अशी की, अशोक महादेव धायगुडे हे मोर्वे गावातील रहिवासी आहेत. त्यांना श्रीनाथ नावाचा अवघ्या नऊ महिन्यांचा मुलगा होता. घटना घडली त्या दिवशी अशोक धायगुडे यांच्या घरात नेहमीप्रमाणे स्वच्छता आणि साफसफाईचे काम सुरु होते. दरम्यान, बाळाच्या आईने घरातील फरशी पुसली आणि फिनेलची बातली जागेवरच ठेऊन ती काही कामानिमित्त घरातच इकडे-तिकडे गेली. इतक्यात आई डोळ्याआड झाल्याचे पाहून नऊ महिन्यांचा श्रीनाथ दुडक्या चालीने फिनेलच्या बादली जवळ आला. त्याला फिनेलचा उग्र वास सहन झाला नाही. त्यातच त्याचा श्वास कोंडला आणि त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा, IIT Student Suicide: आयआयटी चेन्नई येथे महाराष्ट्रातील विद्यार्थ्याची आत्महत्या; आई-वडील मित्रांच्या नावे सुसाईड नोट)
लोणंद पोलिस दप्तरी विक्रम धायगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
तीक्ष्ण वास म्हणजे विशेषत: तीव्र आणि तीक्ष्ण वास जो जबरदस्त किंवा अप्रिय असू शकतो. हे विविध गोष्टींमुळे होऊ शकते जसे की रसायने, विशिष्ट पदार्थ किंवा अगदी शारीरिक कार्ये.
तुम्हाला तीक्ष्ण वास येत असेल जो संबंधित असेल किंवा अस्वस्थता आणत असेल, तर वासाचा स्रोत ओळखणे आणि योग्य कारवाई करणे उपयुक्त ठरू शकते. उदाहरणार्थ, रसायनातून वास येत असल्यास, त्या भागात हवेशीर करणे किंवा संरक्षक उपकरणे वापरणे आवश्यक असू शकते. अन्नातून वास येत असल्यास, अन्नाची विल्हेवाट लावणे किंवा वेगळ्या ठिकाणी साठवणे आवश्यक असू शकते.
तिखट वासाच्या कारणाविषयी तुम्हाला खात्री नसल्यास, वैद्यकीय व्यावसायिक किंवा पर्यावरण तज्ञाचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते. ते आपल्याला वासाचे स्त्रोत ओळखण्यात आणि त्यास संबोधित करण्यासाठी शिफारसी प्रदान करण्यात मदत करू शकतात.