Satara Sexual Crime: तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीला विकले, लॉजवर नेऊन अत्याचार; सातारा येथील खळबळजन घटना

सातारा (Satara) शहरातील एका परिसरातून ही घटना पुढे आली असून, या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.

Sexual Crime | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Satara Crime News: शाळेत शिकणाऱ्या अवघ्या 13 वर्षांच्या मुलीची 3500 रुपयांना विक्री करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. सातारा (Satara) शहरातील एका परिसरातून ही घटना पुढे आली असून, या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एक महिला आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास सुरु असून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाल्याची माहिती नाही. या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, पीडित मुलीची आई वडील काही कामानिमीत्त बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधत परिसरातील भारती अमित कट्टीमणी (रा. कोडोली, सातारा) या महिलेने 13 वर्षी मुलील फूस लावली. आपले काही नातेवाईक येणार आहेत. आपल्याला त्यांच्यासोबत फिरायला जायचे आहे असे सांगून तिने पीडितेला आपल्या सोबत घेतले. पीडितेला घेऊन भारती सातारा येथील एका लॉजवर गेली. तिथे तिने 3500 रुपयांमध्ये व्यवहार ठरवला आणि पीडितेला एका पुरुषाच्या हवाली केले. महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Satara News: फरशी पुसताय? काळजी घ्या! सातारा येथे नऊ महिन्यांच्या बाळाचा फिनेलच्या वासामूळे गुदमरून मृत्यू)

व्यवहार ठरविल्यानंतर आरोपी भारती कट्टीमणी ही पीडितेला पुरुषाच्या स्वाधीन करुन लॉजच्या रुमबाहेर गेली. त्यानंतर सदर पुरुषाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. थोड्या वेळाने भारती परत आली तेव्हा पीडिता रडत होती. तेव्हा भारतीने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरीही पीडितेने तक्रार कायम ठेवल्याने तिला धमकाविण्यात आले. दरम्यान, घडला प्रकार पीडितेने आपल्या आईला फोनवर मेसेज करुन कळवला. मेसेज पाऊन आईने फोन केला असता पीडिता फोनवर रडत होती. आईने पीडितेची कशीबशी समजूत काढत घडला प्रकार वडिलांनाही सांगितला. दरम्यान, या प्रकाराची माहिती होताच हे प्रकरण बाहेरच मिटवीण्यासाठी काहींनी धडपड सुरु केली. त्यासाठीपीडितेच्या आईवडीलांनाही संपर्क करण्यात आला. परंतू, आईने कोणताही दबाव न स्वीकारता थेट शहर पोलीस ठाणे गाठले आणि रितसर तक्रार दिली.

घडला प्रकार तब्बल नऊ दिवसांनी उघडकीस आला आहे. सातारा शहर पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन भारती अमित कट्टीमणी (रा. कोडोली, सातारा) ही महिला आणि एका 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पीडिता ही इयत्त आठवीमध्ये शिकते. पीडितेची आई परगावी गेल्याची संधी साधत भारती कट्टीमणी हिने पीडित मुलीला 28 एप्रिलच्या सायंकाळी लॉजवर नेले. जिथे हा धक्कादायक प्रकार घडला, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, महिला आणि पुरुष असे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. यापैकी परुषाचा चेहरा लॉजवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे आढलून आले आहे.



संबंधित बातम्या