Satara: इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी गर्भवती, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; सातारा येथील घटना

या प्रकरणात एका नवीवीत शिकणाऱ्या मुलावर आरोप असून त्याच्याविरोधात पोक्सो (POCSO) आणि 376 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

Pregnant Girl | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सातारा (Satara News) येथे इयत्ता सातवीत शिकणारी मुलगी गर्भवती (Pregnant Girl Student) राहिल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणात एका नवीवीत शिकणाऱ्या मुलावर आरोप असून त्याच्याविरोधात पोक्सो (POCSO) आणि 376 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. आरोप आहे की, नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये मुलीला गोड बोलून तिच्या घरात प्रवेश केला. तिच्या घरात प्रवेश करुन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मुलीची मासिक पाळी नियमित राहिली नाही. पाळी अनियमीत राहिल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या वेळी हा धक्कादायक प्रकार पुढे आला. डॉक्टरांनी सदर मुलीची सोनोग्राफी करण्यास सांगितले होते.

इयत्ता सातवीत शिकणारी म्हणजेच साधारण 13 ते 14 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याने पालक वर्ग आणि शैक्षणिक वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुलाने मुलीवर केलेल्या कथीत शारीरिक जबरदस्ती आणि लैंगिक संबंधाविरोधात तिने कोठे वाच्यता केली नव्हती. दरम्यान, शारीरिक बदल आणि त्रास वाढल्याने तिने घरातल्यांना कल्पना दिली. त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. डॉक्टरांनी मुलीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनेग्राफीमध्ये मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले. (हेही वाचा, Valentine's Week: प्रेमास मिळालेला नकार कसा स्वीकाराल? 'व्हॅलेंटाईन विक'मध्ये खचून जाऊ नका, समजून घ्या)

दरम्यान, मुलीच्या आईने सातारा शहरातील शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. मुलीच्या आईकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करम्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो मुलगा इयत्ता नववीत शिकतो. पोलिसांनी त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सध्या या मुलाला रिमांड होममध्ये दाखल करण्यात आले आहे. तर मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुलगा आणि मुलगी शालेय विद्यार्थी असले तरी, ते वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकतात. दोघांची मैत्री इन्स्टाग्रामवरुन झाली होती. घडल्या प्रकाराचा मुलगा आणि मुलगी अशा दोघांच्याही कुटुंबीयांना धक्का बसला आहे.