Satara Bus Accident: साताऱ्यात बस दुचाकीला चिरडून झाडावर आदळली, अपघातात एकाचा मृत्यू, प्रवाशी गंभीर जखमी
या अपघातात बसचा पुढचा भागाचा चक्काचूर झाला आहे.
Satara Bus Accident: सातारा (Satara) जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसचा पुढचा भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील वडूज- खटाव मार्गावर जाधव वस्तीजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव बस मोटरसायकलला चिरडत झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात बाईकस्वार जागीच मृत्यू पावला आहे. एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आहे असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितला.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी वडूज-खटाव मार्गावर संध्याकाळी हा अपघात झाला. बसने बाईकला धडक देऊन बस झाडावर आदळली. याच दरम्यान झाडही एसटीवर कोसळलं. एसटी बस झाडावर आदळल्याने २५ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेत आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातात बसने बाईकस्वाराला चिरडले आहे. या अपघातात बसचा पुढील भाग संपुर्ण चक्काचूर झाला आहे. दरम्यान बसवर मोठं झाड आढळल्याने प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. परिसरात अपघातामुळे मोठी खळबळ उडाली.