IPL Auction 2025 Live

Satara Bandh: उदयनराजे भोसले- संजय राऊत वाद पेटला; छत्रपतींच्या गादीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज सातारा बंद!

सोलापूर, सांगली, अहामदनगर येथे काहींनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन देखील केले आहे.

Satara Bandh | Photo Credits: File Photo

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी एका खाजगी कार्यक्रमामध्ये मुलाखत देताना उदयन राजे यांना ते शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवावा असं वक्तव्य केल्यानंतर आता भाजपा नेते छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामधील वाद आता चांगलाच पेटला आहे. दरम्यान यामध्ये छत्रपतींच्या गादीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ उदयनराजे भोसले समर्थकांनी आज (16 जानेवारी) सातारा बंद (Satara Bandh) ची हाक दिली आहे. सोलापूर, सांगली, अहामदनगर येथे काहींनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन देखील केले आहे. राज्यातील 11 कोटी जनता शिवाजी महाराज यांची वंशज: संजय राऊत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उदयनराजे भोसले समर्थक एकवटल्याने सकाळपासूनच सातार्‍यामधील व्यवहार ठप्प झाले आहेत. मुख्य बाजारपेठा बंद झाल्या असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. बसस्टॅंड परिसरामध्ये दुकानं बंद असल्याने अनेक ठिकाणी शुकशुकाट आहे.

दरम्यान आज सातार्‍यामध्ये राजवाड्यातील गांधी मैदान ते पोवाई नाका या भागात मोर्चा काढला जाईल. यावेळेस उदयन राजे भोसले समर्थकांसोबत भाजप कार्यकर्तेमदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकशाहीत तुम्ही कोणीही असाला तरी, तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नव्हे. तंगड्या सर्वांना असतात. लोकशाहीत कोणत्याही प्रकारे अशी भाषा योग्य नव्हे, असे संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना ठणकाऊन सांगितले आहे. तर राज्यातील 11 कोटी जनता शिवाजी महाराज यांची वंशजच आहे. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या विश्वाचे दैवत आहेत आहे. आम्ही महाराजांसमोर नेहमीच नतमस्तक होतो. असेदेखील ते म्हणाले.