सातारा: अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका विवाहित महिलेच्याविरोधात गुन्हा दाखल
ही घटना सातारमध्ये घडली. याप्रकरणी आरोपी महिलेच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एका महिलेने 15 वर्षीय मुलावर लैंगित अत्याचार (Sexually Assaulted) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सातारमध्ये घडली. याप्रकरणी आरोपी महिलेच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित आपल्या मावशीकडे यात्रेसाठी आला होता. त्यावेळी आरोपी महिलेला तरुणाचा अनवधानाने धक्का लागला. मात्र महिलेने घरी आल्यावर पीडिताने जाणीवपूर्वक धक्का दिल्याचा आरोप केला. तसेच तू केलेले गैरवर्तनाविषयी मी तुझ्या भावाला सांगेन अशी भिती तरुणाच्या मनात घालून शाररिक संबंध ठेवण्यात त्याला भाग पाडले. परंतु, त्यानंतरही आरोपी महिला पीडितकडे शाररिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करु लागल्याने त्याने सर्व प्रकार त्याच्या मावशीच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना कायमचा आळा घालण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र, सातारा येथे घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे महिलांसह आता लहान मुलेही सुरक्षित नसल्याचे समजत आहे. अल्पवयीन तरुणाला धमकी देऊन विवाहितेने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. संशयित आरोपी महिलेविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेने आपल्या मावशीच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलांना जाळ्यात अडकवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे, असे पीडित तरुणाच्या पालकांनी तक्रारीत म्हटले आहे. सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे देखील वाचा- परभणी: पत्नीचा अपघाती मृत्यू; नैराश्यातून पतीनेही गळफास लावून संपवले स्वत:चे जीवन
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून हिंगणघाट येथील महिलेला न्याय मिळावा, यासाठी नागरिक अंदोलन करत आहेत. तसेच नागरिकांकडून महिला सुरक्षितेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. यातच लहान मुलेही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने शाळेतील लहान मुलांना धमकी देत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना रत्नागिरी येथे घडली होती.