
पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने पतीनेही गळफास लावून स्वताचे जीवन (Sucide) संपवल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील 2521753सोनपेठ (Sonpeth) तालुक्यातील वडगाव स्टेशन परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे गेल्या काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. 20 फेब्रुवारी दोघेही दुचाकीवरून वडगावला जात असताना, त्यांच्या वाहनाला अपघात झाला. दरम्यान, मृताच्या पत्नीचे जागेवरच मृत्यू झाला. आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याने मृत गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. यातून त्याने आत्महत्या केल्याचे समजत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तसेच मृताच्या कुटुंब आणि मित्र परिवारांकडेही विचारपूस करत आहेत.
सार्थक बचाटे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. सार्थकचे गेल्या काही महिन्यांपूर्वीच चंदा नावाच्या तरुणीशी लग्न झाले होते. मात्र, 20 फेब्रुवारी रोजी दोघेही दुचाकीवरून वडगावला जात असताना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यात चंदा हिला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा सार्थकला मोठा धक्का लागला असून तो नैराश्यात होता. याच नैराश्यातून सार्थकने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला 'चंदाराणी मी तुला भेटायला येतोय'. आई, पप्पा, ताई, दाजी मला माफ करा, मी चाललोय. तर मित्रांना उद्देशून भावांनो तुम्हाला सोडून चाललो, माझ्या मृत्युला कोणीही जबाबदार नाही, असे स्टेटस ठेवून गावा शेजारील शेतात जाऊन झाडाला गळफास घेतला, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे. हे देखील वाचा- संतापजनक! पिंपरी-चिंचवड येथे धावत्या टेम्पोमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार; लिफ्ट देण्याचा बहाण्याने केली फसवणूक
सार्थक याने ठेवलेला स्टेटस पाहून त्यांच्या मित्रांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, तो सापडलाच नाही. त्यानंतर काही वेळाने सार्थक याने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कानावर पडली. या धक्कादायक घटनेनंतर बचाटे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच आजूबाजुच्या परिसरात धक्कादायक वातावरण पसरले आहे.