सातारा: 1 कोटी 50 लाखाच्या विम्यासाठी मित्राला कारसह जिवंत जाळले; आरोपी अटकेत
1 कोटी 50 लाखाच्या विम्यासाठी एका तरूणाने आपल्याच जीवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सातारा ( Satara) जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातील बोधेवाडी घाटात मंगळवारी घडली.
1 कोटी 50 लाखाच्या विम्यासाठी एका तरूणाने आपल्याच जीवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सातारा ( Satara) जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातील बोधेवाडी घाटात मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. व्यवसायात झालेल्या नुकसान भरून काढण्यासाठी आरोपीन स्वताचा अपघाती मृत्यू भासवायचा आणि विमा रक्कम घेऊन पळून जाण्याचा कट त्याने रचला होता. मृताची शरीर यष्टी हुबेहूब आरोपीसारखीच होती. यामुळे आरोपीने आपल्याच मित्राचा खून करून कारसह त्याला पेटवून दिल. मात्र, अवघ्या 4 दिवसांत स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाला छडा लावला.
सुमित मोरे असे आरोपीचे नाव असून तो आई वडिलांसह सायन- कोळीवाडा येथे राहत होता. सुमित गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रोटीन पावडर विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र, त्याला या मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्याच्यावर कर्जही झाले. कर्ज फेडण्यासाठी त्याने मुंबईतील आपल्या मित्राच्या साह्याने एका खाजगी बॅंकेतून स्वत:च्या दीड कोटी रुपयांचा विमा उतवविला होता. दरम्यान, त्याने आपला अपघाती मृत्यू भासवून विम्याची रक्कम घेऊन पळवून जाण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपला मित्र तानाजी आवळे याला लक्ष्य केले. सुमीतने तानाजी याला बाहेरगावी यायचे आहे. यासाठी तू दहिवडी येथे ये, असा निरोप दिला. त्यानुसार तानाजीला घेऊन तो निघाला. जेव्हा कार बोधेवाडी घाटात पोहचल्यानंतर त्याच्या डोक्यात लाकडी स्टंम्पने वार केला, त्यात तानाजी जागीर ठार झाला. हे देखील वाचा- जळगाव: आजोंबाकडून सुन,नातीचा जातीवरुन छळ; तरुणीची गळफास लावून आत्महत्या
उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गुरूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीतच्या कुटुंबियातील सदस्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे दुख दिसत नसल्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय आला. त्यानुसार पोलिसांनी सुमतीच्या भावाकडे चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत सांगितली. तसेच सुमीत हा जेजुरीला लपून बसला आहे, अशी त्याने दिली.
(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2020 01:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

