मुंबईच्या GT पाठोपाठ आता पुण्याच्या Sassoon Hospital मध्ये 'ट्रांसजेंडर स्पेशल वॉर्ड'
मुंबई (Mumbai) च्या जीटी हॉस्पिटल (GT Hospital) नंतर आता पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल (Sassoon Hospital, Pune) मध्ये तृतीयपंथीयांसाठी एक स्पेशल वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता ट्रांसजेंडर लोकांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं सुकर होणार आहे. 24 बेड आणि 2 आयसीयू बेड सह हा वॉर्ड असणार आहे.
समाजाचा तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीसा संकुचित असतो त्यामुळे त्यांना अनेक लहान मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण त्यांना किमान चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ससून हॉस्पिटल मध्ये विशेष सोय करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या स्पेशल वॉर्डचं अनावरण करण्यात आलं आहे.
मुंबईच्या जिटी अर्थात गोकुळदास तेजपाल रुग्णालयात पहिल्यांदा अशाप्रकारे स्पेशल वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. यावरून अनेक सूचना, अभिप्राय समोर आले. त्याची दाखल घेत पुण्यात ससून हॉस्पिटल मध्ये स्पेशल वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. येत्या काही वर्षात अशाप्रकारे राज्यभर हॉस्पिटल मध्ये तृतीयपंथीयांसाठी वॉर्ड्स असणार आहेत. नक्की वाचा: Pune: बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल .
पुणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून 10 तृतीयपंथीयांना नोकरीची संधी दिली आहे. यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा असा उद्देश आहे.