Sarkari Naukari: बीएमसी मध्ये सहायक आयुक्त, अधिष्ठाता वर्गासाठी होणार नोकरभरती; MPSC द्वारा होणार निवड
यामध्ये एक जागा कर्णबधिर किंवा दिव्यांग वर्गासाठी देखील राखीव ठेवली आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी आता बीएमसी (BMC) मध्ये मोठी नोकरीची संधी आहे. लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी द्वारा सहायक आयुक्त, बीएमसी, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ व अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ यासाठी नोकरभरती होणार आहे. या करिता उमेदवारांची निवड एका परीक्षेद्वारा होणार असून 26 जुलै 2021 पर्यंत त्यासाठी अर्ज करण्याची मुभा आहे. दरम्यान ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून होणार आहे. नक्की वाचा: BMC Recruitment 2021: मुंबई महापालिकेत मेगा भरती; 2000 हून अधिक रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची 'ही' आहे अंतिम तारीख.
सहायक आयुक्त, बृहन्मुंबई, महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ यासाठी एकूण 16 जागांवर पदभरती होणार आहे. यामध्ये एक जागा कर्णबधिर किंवा दिव्यांग वर्गासाठी देखील राखीव ठेवली आहे. याकरिता ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. mpsc. gov.in या एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वर नोकर भरती बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
सहायक आयुक्त पदासाठी आणि अधिष्ठाता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 719 रुपये शुल्क तर राखीव व अनाथ उमेदवारांसाठी 449 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 200 गुणांची लेखी परीक्षा आणि 50 गुणांची मुलाखत अशा दोन टप्प्यांत उमेदवार पारखून योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
सहायक आयुक्त, बृहन्मुंबई, महानगरपालिका याकरिता वेतनश्रेणी एम 35, 67,700 ते 2,08,700 या पे स्केल वर पगार असेल. तर अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ मध्ये स्तर 14 पगार 1,44,200 ते 2,18,200 हा पे स्केल असेल. इथे पहा सहायक आयुक्त, बीएमसी च्या नोकरभरतीचं सविस्तर नोटिफिकेशन आणि महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ व अधिष्ठाता चं इथे पहा सविस्तर नोटिफिकेशन .
दरम्यान मुंबई महानगर पालिकेत सध्या वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिव्हिस्ट अटेस्टंट नेफ्रोलॉजिस्ट, ओलॉजिस्टन, न्यूरोलॉजिस्ट , सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS आणि प्रशिक्षित अधिपरिचारिका पदासाठी देखील नोकरभरती आहे. सुमारे 2 हजार जागांवर याच्या द्वारा नोकरभरती होणार आहे.