Sardar Tara Singh Death Rumours: मुंबई भाजपा नेत्यांनी सरदार तारा सिंह यांच्या निधनाचा शोक संदेश शेअर केल्यानंतर ट्वीटस केले डिलिट

भाजपा नेते आणि महाराष्ट्रातील माजी आमदार सरदार तारासिंह यांचे दुःखद निधन झाले आहे असे ट्वीट काही वेळापूर्वी महाराष्ट्र भाजपाच्या Vice President चित्रा वाघ यांनी ट्वीटर वरून केले होते.

Tara Singh | Photo Credits: twitter

भाजपा नेते आणि महाराष्ट्रातील माजी आमदार सरदार तारासिंह (Sardar Tara Singh) यांचे दुःखद निधन झाले आहे अश  अशी ट्वीट काही वेळेपूर्वी मुंबई मधील भाजपा मधील नेत्यांनी केल्यानंतर काही वेळातच ती डिलिट करण्यात आली आहेत. दरम्यान भाजपा नेते किरीट सौमय्या यांनी ट्वीटरच्या माध्यमातून तारा सिंह यांच्या प्रकृती बद्दल माहिती देत निधनाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. तारा सिंह हे मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल असून त्यांच्या उपचार सुरू आहेत. तारा सिंह यांची प्रकृती चिंताजनक असली तरीही स्थिर आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा असं आवाहन किरीट सौमय्या यांनी केलं आहे.

 

भाजपाच्या Vice President चित्रा वाघ (Chitra Kishor Wagh) यांनी ट्वीटर वरून तारा सिंह यांच्या निधनाची बातमी शेअर केली होती. दरम्यान, 'मेरा काम ही मेरी पहचान”आयुष्याच्या शेवटाच्या क्षणापर्यंत या त्यांच्या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करत राहणारे नगरसेवक ते आमदार अशी जवळजवळ ४० वर्ष राजकीय कारकीर्द गाजवणारे आमदार सरदार तारासिंह यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांना चिरशांती देवो हीच प्रार्थना' असं त्यांनी ट्वीट केले होते.

सरदार तारा सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात मुंबई महानगर पालिकेतून झाली होती. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे.  दरम्यान चित्रा वाघ यांच्या पाठोपाठ आमदार राम सातपुते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते नवाब मलिक यांनी देखील तारा सिंह यांच्यासाठी शोक संदेश लिहला होता.

सरदार तारासिंह हे महाराष्ट्राचे माजी आमदार होते. मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदार संघाचे त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व केले होते. 2018 साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेड च्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिला होता. मागील वर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा  रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली होती.