Saptashrungi Navratri Utsav 2023: नवरात्री मध्ये सप्तशृंगीदेवी चं दर्शन यंदा भाविकांसाठी 24 तास खुले
नांदुरीगड च्या पायथ्याशी बस आणि खाजगी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात येणार आहे.
अवघ्या 10 दिवसांमध्ये नवरात्र उत्सव (Navratri Utsav) सुरू होणार आहे. देवीच्या आगमनाची, गरब्याची धामधूम सुरू होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी यंदा सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानने (Shree Saptashrung Niwasini Devi Trust) नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवी (Saptashrung Devi) चे 24 तास दर्शन खुले राहणार असल्याची घोषणा केली आहे. शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवरात्री मध्ये प्रामुख्याने भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या काळातील गर्दी पाहता आता सप्तशृंगगडावर सप्तशृंगी देवीची दर्शन व्यवस्था 24 तास सुरू राहणार आहे. 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत दर्शनासाठी 24 तास मंदिर खुले राहणार आहे. यावेळी मातेच्या दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नवरात्री मध्ये देवीच्या दर्शनाला अनेक भाविक पायी पालख्या घेऊन येतात. नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये खाजगी वाहनांना गडावर बंदी असणार आहे. नांदुरीगड च्या पायथ्याशी बस आणि खाजगी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. या काळात नियमित 40-50 हजार भाविक दर्शन घेतात. नक्की वाचा: Shardiya Navratri 2023 Date: शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे? तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या .
सप्तशृंगी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. सप्तशृंगी देवीला श्री भगवती माता म्हणूनही ओळखले जाते सोबतच तिची ओळख वणीची देवी म्हणून देखील आहे.