IPL Auction 2025 Live

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla: भक्तिमय वातावरणात आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; CM Eknath Shinde यांनी घेतले ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन (Watch Video)

प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla (संग्रहित संपादित प्रतिमा)

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla: भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री शिंदे यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारकरी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य आदी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल वारकरी संत महंत पाईक संघटना मधील प्रमुख महाराज यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायातील  मान्यवरांसोबत संवाद साधला.

पहा व्हिडिओ- 

आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदिर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनिक्षेपणाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे. (हेही वाचा: Pandharpur Ashadhi Wari 2024: आषाढी वारीसाठी आज देहू येथील संत तुकाराम महाराज गाथा मंदिरापासून सुरुवात)

पालखी मार्गावर आरोग्य विभागाने आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध केलेल्या असून वारी मार्गावर फिरत्या वैद्यकीय पथकाची सोयही केलेली आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. मोबाईल टॉवरची नेटवर्क फ्रिक्वेंसी वाढविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर असलेल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील 10 टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.



संबंधित बातम्या