Maval Lok Sabha constituency: अजित पवारांनी जोर लावला पण मोहरा उद्धव ठाकरे यांच्या गळाला, मावळ लोकसभा मतदारसंघात काय होणार?
मात्र, असे असतानाच त्यांचा विश्वासू मोहरा संजोग वाघेरे यांनी शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे पारडे या मतदारसंघात जड झाले आहे.
Sanjog Waghere Joins Thackeray Group: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या अनुषंघाने महाराष्ट्रातील राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूटीनंतर विरोधकांसबत पक्षांतर्गत संघर्षही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून (Maval Lok Sabha Constituency) आपल्या पक्षाचा (NCP) उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, असे असतानाच त्यांचा विश्वासू मोहरा संजोग वाघेरे यांनी शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश केला आहे.
अजित पवार यांना धक्का पार्थ पवारांची कोंडी
मावळ लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा सांगितला आहे. या वेळीसुद्धा ते आपले चिरंजीव पार्थ पवार यांनाच मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मावळच्या जनतेने पार्थ पवार यांना नाकारले आहे. आपल्या राजकीय पदार्पणाच्या पहिल्या सभेत पार्थ यांना धड भाषणही करता आले नव्हते. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन शिवसेना पक्षाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला. असे असताना संजोर वाघेरे यांचा शिवसेना (UBT) पक्षप्रवेश अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: शिवसेना (UBT) कडून मोठा दावा, काँग्रेसचा नकार; जागावाटपासाठी महाविकासआघाडीचा 16-16 चा फॉर्म्यूला?)
कोण आहेत संजोर वाघेरे?
संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. शिवाय, माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे ते पूत्र आहेत. त्यांनी काही काळ पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार महापौर पदावरुन पाहिला आहे. त्यांच्या घरामध्ये राजकीय परंपरा राहिली आहे. त्यांना वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला आहे. ते स्वत: नगरसेवक, महापौर राहिले आहेत. शिवाय त्यांच्या पत्नीही नगरेविका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे सलग 8 वर्षे ते शहराध्यक्ष राहिले आहेत. खास करुन शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. (हेही वाचा, Viksit Bharat Sankalp Yatra: भारत संकल्प यात्रेआडून मोदींचा प्रचार? सरकारी अधिकाऱ्यांकडून कामकाजालाच नकार, जिल्हाधिकाऱ्यांना धाडले पत्र)
व्हिडिओ
मावळमध्ये आवाज कोणाचा?
मावळ लोकसभा मतदारसंघ हा प्रदीर्घ काळ शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. लोकसभा नवडणूक 2019 मध्येही मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्या रुपात शिवसेना उमेदवारच निवडून आला आहे. मात्र, सध्या स्थितीमध्ये शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्याने एक गट उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिला आहे. तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूला गेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार बारणे हे शिंदे यांच्या गटात आहेत. शिंदे यांनी भाजपसोबत युती केली आहे. या युतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला आहे. त्यामुळे त्यांची महायुती आहे. अशा वेळी मावळची जागा शिंदे गट लढवणार की अजित पवार गट? याबाबत उत्सुकता आहे. असे असले तरी अजित पवार यांना तुर्तास तरी धक्का बसल्याचे मानले जात आहे.