Rafel Deal: राफेल करारावर निशाणा साधत राम मंदिर प्रकरणी संजय राऊत यांचा न्यायालयाला टोला
त्यामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायलयाने राफेल करारावर दिलेल्या स्पष्टीकरणावर निशाणा साधत राम मंदिर प्रकरणी सुद्धा न्यायालयाने निर्णय घेऊ नये असा टोला लगावला आहे.
New Delhi: सर्वोच्च न्यायालयाने राफेल काराराबाबतीतल याचिका आज फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी न्यायलयाने राफेल करारावर दिलेल्या स्पष्टीकरणावर निशाणा साधत राम मंदिर प्रकरणी सुद्धा न्यायालयाने निर्णय घेऊ नये असा टोला लगावला आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला राफेल करारावरुन दाखल झालेल्या याचिकेवर अंतिम निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयावर सर्वोच्च न्यायलयाने असे म्हटले आहे की, या खरेदीमध्ये कोणताही संशयास्पद व्यवहार झालेला नाही. त्यामुळे सरकाराने दिलेल्या निर्णयावर कोणताही प्रश्न उभा करणे अयोग्य आहे असे सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी सांगितले आहे.(हेही वाचा-फेल विमान खरेदीत कोणताही गैरव्यवहार नाही: सर्वोच्च न्यायालय)
या निर्णयावर आक्षेप घेत संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाने काही चुकीचे सांगितले नसून त्याची किंमत ठरविणे न्यायालयाचे काम नाही. त्याप्रमाणे राम मंदिर प्रकरणी ही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेणे ही न्यायालायाचे काम ही नाही. त्यामुळे राफेलचा कराराचा मुद्दा संसदेत सोडविला जाऊ शकतो. मात्र राम मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सोडविला जाऊ शकत नाही असे संजय राऊत यांनी मत मांडले आहे.