Sanjay Raut on Radhakrishna Vikhe Patil: 'जबरदस्तीने काम करु नका, याला बलात्कार म्हणतात', संजय राऊत यांचा राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला

राधाकृष्ण विखे पाटील यांना मंगळसूत्र बदलण्याची सवयच आहे, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर ' मान्य नसेल तर जबरदस्तीने काम करु नका, याला बलात्कार म्हणतात', असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री', असे विधान करणाऱ्या भाजप नेते राधकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टोला लगावला आहे. प्रेम एकावर करायचं आणि नांदायचं दुसऱ्या सोबत. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंगळसूत्र बदलण्याची सवयच आहे, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर ' मान्य नसेल तर जबरदस्तीने काम करु नका, याला बलात्कार म्हणतात', असेही राऊत यांनी म्हटले आहे. शिर्डी येथील राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित 'मिट द प्रेस' कार्यक्रमात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'एकनाथ शिंदे हे चांगले नेते आहेत. पण देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत', असे विधान केले होते.

संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जहरी टीका करत म्हटले की, तनातील वेगळे आणि मनातील वेगळे अस का? विद्यमान मुख्यमंत्री जर तुम्हाला नको असतील तर त्यांच्या हाताखाली कामच कशाला करता. प्रेम एकावर करायचं आणि नांदायचं दुसऱ्यासोबत, असंच झालं हे, असा निशाणा राऊत यांनी लगावला आहे. विखे पाटलांना उद्देशून बोलताना राऊत पुढे म्हणाले, आगोदर ते काँग्रेसमध्ये होते. मग आमच्यासोबत आले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन आता भाजपत आहेत. त्यांना मंगळसूत्र बदलण्याची सवयच असल्याचे राऊत म्हणाले. (हेही वाचा, Radhakrishna Vikhe Patil On Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील भाजप नेता म्हणतो 'देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री')

काय म्हणाले होते विखे पाटील?

राहता येथील 'मिट द प्रेस' कार्यक्रमात विखे पाटील यांना अजित पवार यांच्या मनात काय? असा सवाल विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, शरद पवार हे अवघ्या महाराष्ट्राला संभ्रमात टाकतात. पण, या वेळी अजित पवार यांनी स्वत: शरद पवार यांनाच संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्याच मनाचा तळ लागत नाही. कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही. यावर तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण? असा सवाल विखे पाटील यांना उपस्थित करण्यात आला. यावर ते म्हणाले, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्कीच चांगले नेते आहेत. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. विखे पाटील यांच्या विधानावरुन शिंदे गटाची प्रतिक्रिया काय येते याबाबत उत्सुकता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif