Sanjay Raut Press Conference: महाराष्ट्र आणि मराठी माणूस गांxची अवलाद नाही, संजय राऊत यांचा भाजपला इशारा

तुम्ही कितीही पाठिमागून वार केले तरी मराठी माणूस, शिवसेना (Shiv Sena) घाबरणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Press Conference) यांनी केंद्र सरकार आणि भाजपला (BJP) दिला आहे.

Sanjay Raut |

महाराष्ट्र आणि मराठी माणूस गांxचीची अवलाद नाही. तुम्ही कितीही पाठिमागून वार केले तरी मराठी माणूस, शिवसेना (Shiv Sena) घाबरणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Press Conference) यांनी केंद्र सरकार आणि भाजपला (BJP) दिला आहे. पाठीमागील काही दिवसांपासून शिवसेना, ठाकरे परिवार आणि शिवेसना पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पावर यांच्या कुटुंबीय यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा हल्ले करत आहेत. हे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशावरचे संकट आहे. त्यांना (भाजप) महाराष्ट्रातील सरकार पाडायचे आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे नेते दररोज नवी तारीख देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि केंद्रीय सत्तेचा पाठिंबा असल्यानेच भाजपचे नेते रोज नव्या तारखा देत आहेत. महाविकासआघाडी सरकार आज पडेल उद्या पडेल, आम्ही घाबरत नाही.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा फोन

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, भाजप आणि ईडीवर जोरदार हल्लाबोल केला. या वेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरुन ही पत्रकार परिषद पाहात आहेत. त्यांच्या मला थोड्याच वेळापूर्वी फोन होता. शरद पवार यांचाही मला थोड्यावेळापूर्वी फोन आला. महाविकासआघाडीमधील प्रत्येक प्रमुख नेत्यांचा आज सकाळपासून मला फोन आले. त्या सर्वांनी मला सांगितले, असे संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut Press Conference: संजय राऊत यांची पत्रकार परिषद, शिवसेना भवन परिसरात जय्यत तयारी; शेकडो शिवसैनिक मुंबईत दाखल)

आमची तयारी झाली आहे

संजय राऊत यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाचे काही लोक काही दिवसांपूर्वी मला तीन वेळा भेटले. त्यांनी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या सरकारमधून बाहेर पडा. आमची संपूर्ण तयारी झाली आहे. एक तर आम्ही राष्ट्रपती राजवट लावू. नाहीतर काही आमदार आमच्या हाताशी लागत आहेत. आपण आम्हाला सहकार्य करा. सरकारमधून बाहेर पडा. तुम्ही काही प्रमुख लोकं सरकार पाडण्यासाठी जर सहकार्य करत नसाल तर केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक तुम्हाला टाईट करतील, फिक्स करतील.

ट्विट

ठाकरे सरकार पडू देणार नाही

जे लोक मला सरकारमधून बाहेर पडा हे सांगत होते त्यांना मी सांगितले की, ठाकरे सरकारला नख लाखेल असे कृत्य आम्ही करणार नाही. आम्हा कुणाकडूनच असे घडणार नाही. तुम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करु नका. आम्ही प्रतिकार करु. यावर त्यांनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्रातील सरकार पाडू. महाराष्ट्रात ठिणगी पडली तर केंदीय पोलीस दल महाराष्ट्रात तैनात करु. त्यानंतर काहीच दिवसात माझे कुटुंबीय, नातेवाईक आणि शरद पवार यांच्या कुटुंबीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या. दरम्यान, मुंलुंडचा दलाल पत्रकार परिषदा घेतो. संजय राऊतला ईडी आता अटक होईल. उद्या अटक होईल.