Sanjay Raut: भाजप सरकारी कंपन्यांप्रमाणे तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण करत आहे
सीबीआय (CBI) आणि एनसीबी (NCB) ज्याप्रकारे काम करीत आहेत ते पाहता देशातील तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय, असा प्रश्न पडत असल्याची खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातील (Saamana) ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊत( Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपला (BJP) लक्ष्य केले आहे. सीबीआय(CBI) आणि एनसीबी(NCB) ज्याप्रकारे काम करीत आहेत ते पाहता देशातील तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय, असा प्रश्न पडत असल्याची खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अनेक सरकारी कंपन्या आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकण्यात आल्या. देशातील अनेक सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण मोदी यांच्या सरकारने केले. ‘‘दोघेजण विकायला बसलेत व दोघेच जण खरेदी करतात,’’ अशी टवाळी त्यावर सुरू आहे. (हे ही वाचा BMC Election 2022:बीएमसी निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढतील- रामदास आठवले.)
रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. त्याचवेळी महाराष्ट्रात याला तुरुंगात टाकू व त्यालाही तुरुंगात टाकू, असे भाजपचे नेते रोज सकाळी उठून सांगतात. तेव्हा देशातील तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय? असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते. 2024 पर्यंत हे सहन करावेच लागेल. संपूर्ण देशच हळूहळू तुरुंग होताना दिसत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष महागाईवर बोलत नाही. पेट्रोल 5 रुपयांनी कमी केले म्हणून ते बागडत आहेत, पण 5 रुपये कमी करूनही पेट्रोल-डिझेल शंभरीपार आहे. केंद्र सरकारने पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त केले. यामुळे ‘भाजप’चे लोक खूश झाले व पहा आपले पंतप्रधान किती मोठय़ा मनाचे असे सांगू लागले. शंभरी पार केल्यावर पाच-दहा रुपये कमी करणे हा दिलासा म्हणता येणार नाही.
आज पेट्रोल 115 रुपये आणि डिझेल 107 रुपये. म्हणजे शंभरीचा पारा उतरायला तयार नाही, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.