Sanjay Raut ED Enquiry: संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर सत्ताधाऱ्यांसह विरोधक म्हणतात..
विविध नेत्यांकडून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे. भाजपच्या देखील अनेक बड्या नेत्यांनी संजय राऊंतावर टीकेची झोड उठवली आहे.
पत्राचाळ प्रकरणी आज सकाळी ईडीने (ED) शिवसेना (shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. जवळपास 5 तासांपासून संजय राऊतांसह कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. तरी राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक होत घोषणाबाजी करत आहेत. राज्यभरातून सत्ताधाऱ्यासह विरोधकांकडून या घटनेवर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहे. तरी राज्याच्या या ED च्या कारवाईचे काय पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. काही वेळापूर्वी संजय राऊतांनी खुद्द खिडकीतून बाहेर येत शिवसैनिकांसह माध्यमांना हात दाखवला आणि ईडी कारवाई नंतर संजय राऊत यांची पहिली झलक बघायला मिळाली.
कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांना पाठींबा दर्शवण्यात आला आहे. विविध नेत्यांकडून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे. भाजपच्या देखील अनेक बड्या नेत्यांनी संजय राऊंतावर टीकेची झोड उठवली आहे. (हे ही वाचा:- ED at Sanjay Raut Residence: ईडीच्या कारवाई नंतर संजय राऊत यांची पहिली झलक, बघा व्हिडीओ)
सीबीआय आणि ईडीचा राजकारणाशी संबंध नाही- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
सीबीआय आणि ईडी स्वतंत्रपणे काम करतात. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रीया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
भाजपाला विरोधाचा आवाज पूर्ण बंद करायचा आहे- कॉंग्रेस नेते सचिन सावंत
कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, संजय राऊत यांच्या घरावर पोहोचलेली ED लोकशाहीच्या विदारक अवस्थेचे चित्र दर्शवत आहे. भाजपाला विरोधाचा आवाज पूर्ण बंद करायचा आहे. ED तपास यंत्रणा नसून आवाज दमन अस्त्र आहे. भाजपात गेल्यावर या अस्त्रापासून संरक्षण मिळते. आम्ही संजय राऊतांच्या पाठीशी उभं राहू अशी प्रतिक्रीया सचिन सावंत यांनी दिली आहे.
अखेर संजय राऊतांना त्यांच्या भ्रष्टाचाराचा जाब द्यावा लागणार – किरीट सोमय्या
पत्राचाळ प्रकरणात ED ने खासदार संजय राऊत यांना समन्स बजावला होता. आज EDची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. प्रकरणी भाजप कडून कडून पहिली प्रतिक्रीया देत किरीटी सोमय्या यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अखेर संजय राऊत यांना भ्रष्टाचाराचा, माफियागिरी आणि दादागिरीचा जाब द्यावाचं लागणार अशी प्रतिक्रीया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
संजय राऊत ईडीला घाबरून भाजपला शरण गेले नाहीत- अमोल मिटकरी
अपेक्षेप्रमाणे ईडी नावाचे पाहुणे श्री संजय राऊत यांच्या घरी भल्या पहाटे दाखल झाले आणि एक हाती किल्ला लढवणाऱ्या व प्रत्येकवेळी शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकावर कारवाई सुरु केली. आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील. संजय राऊत ईडीला घाबरून भाजपला शरण गेले नाहीत अशी प्रतिक्रीया राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा संजय राऊतांना पाठींबा दर्शवत थेट केंद्रीय मंत्री स्मृती इराणीवर निशाणा
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी सकाळी क ट्वीट केल आहे ज्यात लिहलं आहे, तेरा ध्यान किधर है, फ्रॉड इधर है आणि याबरोबर एक्सप्रेस न्यूज सर्विस या वृत्तपत्राने स्मृती इराणीच्या मुलीबाबत छापलेलं वृत्त जोडण्यात आलं आहे. म्हणजे या ट्वीट मधून खासदार प्रियंका चतुर्वेदींनी संजय राऊत यांना पाठींबाच नाही तर थेट केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर हल्लाबोल केला आहे.