Sanjay Raut Death Threat: राजा ठाकूर यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केला गुन्हा, म्हणाल्या- 'माझ्या पतीला गुंड म्हणण्याचा अधिकार कोणी दिला?' (Watch)

तसेच हा आरोप स्टंटबाजी करण्यासाठी केलेला आहे का? याचाही तपास केला जाईल.’

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

राजा ठाकूर (Raja Thakur) यांच्या पत्नी वकिल पूजा ठाकूर यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आपले पती राजा ठाकूर यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल ही तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याने ‘गुंड’ राजा ठाकूरला मला मारण्यासाठी नेमले होते, असे संजय राऊत म्हणाले होते.

आता पूजा यांनी सांगितले की, त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात कापूरबावडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ‘माझ्या पतीला गुंड म्हणण्याचा अधिकार त्यांना (संजय राऊत) कोणी दिला?’, असा सवाल त्यांनी माध्यमांच्या निवेदनात उपस्थित केला.

खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पोलिसांना पत्र लिहून शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आपल्याला ठार मारण्यासाठी ठाण्यातून गुंड नेमल्याचा आरोप केला आहे. यानंतर ठाणे पोलिसांनी बुधवारी संजय राऊत यांचा जबाब नोंदवला. तसेच राऊत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

राऊत यांच्या पत्रावर फडणवीस म्हणाले, 'माझा प्रश्न आहे की हे पत्र संरक्षण मागण्यासाठी आहे की खळबळ उडवण्यासाठी? सुरक्षेचा विषय राजकारणाशी जोडणे ही मोठी चूक आहे. पुराव्याशिवाय असे आरोप करणे योग्य नाही. संजय राऊत असोत वा अन्य कोणी, सुरक्षेशी संबंधित सर्व कारवाई आपला गुप्तचर विभाग आणि सुरक्षा संबंधित समिती करते. राऊत यांचे पत्र गुप्तचर आयुक्तांकडे जाणार असून समिती त्यावर योग्य निर्णय घेईल.’ (हेही वाचा: संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीची चौकशी करु- एकनाथ शिंदे)

दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल. तसेच हा आरोप स्टंटबाजी करण्यासाठी केलेला आहे का? याचाही तपास केला जाईल.’



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif