Sanjay Raut Comment On WHO: संंजय राउत यांनी डॉक्टर, कंंपाउंडर, जागतिक आरोग्य संघटना यांंच्यावरील टिपण्णी वर दिलं 'हे' स्पष्टीकरण
जागतिक आरोग्य संघटना (WHO) हा राजकारण्यांचा अड्डा आहे, मी डॉक्टर पेक्षा कंपाउंडर कडुन औषध घेतो असे अनेक तिखट बोल काढुन आता शिवसेनेचे खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी आपल्या वाक्यांवर स्पष्टीकरण दिले आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) मुळे कोरोना (Coronavirus) वाढला , मी डॉक्टर पेक्षा कंपाउंडर कडुन औषध घेतो असे अनेक तिखट बोल काढुन आता शिवसेनेचे खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनी आपल्या वाक्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. अलिकडे एबीपी माझाच्या मुलाखतीत त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधत खरे खोटे सुनावले होते तसेच आपण कंपाउंडर वर अधिक विश्वास ठेवतो अशा आशयाचे भाष्य सुद्धा केले होते ज्यावरुन त्यांंनी माफी मागावी अशी मागणी करत भाजप कडुन विरोध दर्शवण्यात आला होता, मात्र यातुन डॉक्टरांंचा अपमान करण्याचा आपला कोणताही हेतु नव्हता असे म्हणत राउत यांनी आपलं म्हणण पुन्हा माध्यमांसमोर मांंडलं आहे. डॉक्टरांबाबतच्या ‘त्या’ व्यक्त्यव्यामुळे खासदार संजय राऊत अडचणीत; महाराष्ट्र IMA ने केली माफीची मागणी
संजय राऊत यांनी सामना कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना म्हंंटले की, "कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत, माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. मी कधी करणारही नाही. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभं राहिलो आहे. अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत मात्र अशा मंंडळींंनी अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे." जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, 'सामना' च्या अग्रलेखातून शिवसेनेचा पंतप्रधानांना टोला
तसेच, कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून कोणत्याच राजकीय पक्षाने विनाकारण टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही,” असंही संजय राऊत यांनी म्हंटल आहे.मात्र तरीही जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. असं करु नये” अशी विनंती संजय राउत यांंनी केली आहे
दुसरीकडे “जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे माझंच नाही तर अनेक देशांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे त्यांच्याशी संंबंध तोडलेत. तिथे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त झाले आहेत. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी WHO जबाबदार असल्याचं रशिया सहित अनेक देशांनी म्हटलं आहे. पण मग तुम्ही ट्रम्प आणि रशियाचाही निषेध करणार का ? असा सवाल राउत यांंनी केला आहे.
दरम्यान कोण्या एका क्लिप मध्ये नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांना रुग्णसेवेत रस नसून औषधं विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी विधान केले होते. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, येथील नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही,” असेही राउत यांंनी म्हंंटले आहे. यावर अद्याप महाराष्ट्र भाजप कडुन अजुन प्रतिक्रिया समोर आलेली नाही.